वावंजे ते चिंध्रण रोडवरील वेलटेक मेटल स्टील कंपनीसमोरील मोकळ्या जागेत उभी केलेली रिक्षाची चोरी
पनवेल, दि.28 (संजय कदम) ः 40 हजार रुपये किंमतीच्या बजाज कंपनीच्या रिक्षाची चोरी अज्ञात चोरट्यांनी वावंजे ते चिंध्रण रोडवरील वेलटेक मेटल स्टील कंपनीसमोरील मोकळ्या जागेत उभी केली असता केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
भारतभुषण गंगाप्रसाद भट (54) यांची 40 हजार रुपये किंमतीची बजाज कंपनीची काळ्या व पिवळा पट्टा असलेली रिक्षा क्र.एमएच-03-बीएन-8541 ही वरील ठिकाणी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर रिक्षा चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.