मोटार सायकलची चोरी
पनवेल, दि.29 (संजय कदम) ः पनवेल जवळील मौजे ः वडघर, बौद्ध विहार जवळ उभी करून ठेवलेली 50 हजार रुपये किंमतीची टीव्हीएस बीएस व्हीआय स्कूटर अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
राजेश मोरे यांची 50 हजार रुपये किंमतीची एमएच-06-सीई-5539 ही त्यांनी कॅटींगच्या बाहेर रस्त्यावर उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी मोटार सायकल चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.