29 टन कांद्या संदर्भात 4 लाख 75 हजार रुपयाची फसवणूक
पनवेल, दि.29 (संजय कदम) ः मोबाईल फेसबुक साईटवर इंपोर्ट एक्स्पोर्ट संबंधित ग्रुपवर एका व्यक्तीची ओळख झाल्याने त्याने सांगितल्याप्रमाणे 29 टन कांदा हा दुबईला पाठवायचा आहे व त्या मोबदल्यात तुम्हाला 4 लाख 75 हजार रुपये मिळतील असे आमिष दाखवून फसवणूक केल्याची तक्रार पनवेल शह पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
अमित माने यांची मोबाईल फेसबुक साईटवर इंपोर्ट एक्स्पोर्ट संबंधित ग्रुपवर अज्ञात व्यक्ती संतोष पवार यांची ओळख होवून त्यांच्याशी संपर्क साधला असता त्याने सांगितल्याप्रमाणे 29 टन कांदा हा दुबईला पाठवायचा आहे व त्या मोबदल्यात तुम्हाला 4 लाख 75 हजार रुपये मिळतील असे आमिष दाखविले. परंतु आतापर्यंत टेलिग्राफीक ट्रान्सफर परत न करता त्याची खोटी पावती पाठवून सदर व्यक्तीने त्यांची फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.