निमिषा थवईने घेतले आमदार महेश बालदी यांची भेट.
उरण दि 30(विठ्ठल ममताबादे )32 व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट तलवारबाजी स्पर्धेमध्ये पनवेलच्या निमिषा थवई हिला कांस्य पदक मिळाले.सदर स्पर्धा शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे झाली.निमिषा थवई (वय 15) हिने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर खुल्या गटामध्ये फॉइल या प्रकारात कांस्य पदक मिळविले. प्रसंगी आमदार महेश बालदी यांनी खेळाडूंना बोलून त्यांची विचारपूस करून तिचा योग्य सत्कार केला.योग्य ती मदत खेळाडूंसाठी देऊ असा शब्द ही दिला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पालक, इतर मान्यवर तसेच प्रशिक्षक मिलिंद ठाकूर, वैभव पेटकर, स्वप्नील मोरे, किरण जोशी, विशाल पाटेकर आदी मान्यवर उपस्थित होते.