मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी तालुका पोलीस स्टेशन समोरील चौकातला खड्डा बुजवून घेतला.
पनवेल/प्रतिनिधी:स्वामी नित्यानंद मार्ग या मुख्य रस्त्यावरील तालुका पोलीस स्टेशन समोर असलेल्या चौकात ड्रेनेज झाकणाच्या बाजूला असलेले पेव्हर ब्लॉक दबले गेल्यामूळे खड्डा पडला होता.त्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती तसेच रिक्षा व दुचाकी वाहन चालकांना ही या खड्डयामुळे त्रास होत होता.या बाबतची तक्रार अनेक नागरिक,वाहन चालक आणि रिक्षा चालकांनी कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांच्याकडे केली.विक्रांत पाटील यांनी महानगरपालिका अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला सांगून त्वरित हा त्रासदायक खड्डा बुजवून घेतला.नगरसेवक विक्रांत पाटील
नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवतात याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले.