वशेणी ग्रामस्वच्छता अभियानास उदंड प्रतिसाद.
उरण दि 31(विठ्ठल ममताबादे )वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने आयोजित केलेल्या ग्रामस्वच्छता अभियानास वशेणीच्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद देऊन पहिल्या टप्प्यातील स्वच्छतेचा कार्यक्रम यशस्वी केला.या कार्यक्रमाचा शुभारंभ वशेणी गावचे सरपंच जीवन गावंड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या वेळी वशेणी गावातील महत्वाचे नऊ भाग स्वच्छ करण्यात आले. या स्वच्छता अभियानात वशेणी गावातील शालेय विद्यार्थी, श्रीसदस्य, युवावर्ग महिला आणि जेष्ठ नागरिक सहभागी झाले होते.
या प्रसंगी उरण तालुक्याच्या सभापती समिधा निलेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते निलेश म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते नित्यानंद म्हात्रे , माजी ग्रामपंचायत सदस्य आवरे महेश म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे,महेश गावंड, महेंद्र गावंड, पोलिस पाटील दिपक म्हात्रे, आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन व स्वतः सफाई करून वशेणीच्या नागरिकांचा उत्साह वाढवला.
वशेणी ग्रामस्वच्छता अभियाना अंतर्गत पहिल्या टप्प्यात महत्वाचे अंतर्गत रस्ते,दुस-या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणे,तिस-या टप्प्यात वशेणी दादर रस्ता आणि चौथ्या टप्प्यात स्वच्छ अंगण स्पर्धा आयोजीत केली जाईल अशी माहिती वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी उपस्थित स्वच्छता दूत व मान्यवरांना दिली.
सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मंडळाच्या सदस्यांसह ग्रामपंचायत सदस्य गणपत ठाकूर, कृष्णा ठाकूर,शोभा पाटील,माजी सरपंच प्रसाद पाटील, प्राध्यापक शिवहारी गावंड ,महेंद्र उमाजी पाटील तकदीर पाटील, अमर पाटील पराग पाटील, छाया ठाकूर, सुवर्णा ठाकूर ,कैलास पाटील, संजीव ठाकूर, जे.डी.म्हात्रे, कु.सायली पाटील,वामन पाटील, भालचंद्र पाटील, जगदीश म्हात्रे , बळीराम म्हात्रे, अनंता म्हात्रे,गिरिश पाटील, अविनाश पाटील, प्रतिक पाटील, अधिकार पाटील, ताई ठाकूर , मनिष पाटील,प्रितेश ठाकूर, पारिख म्हात्रे, राघव पाटील , जितेंद्र पाटील महादेव पाटीलआदींनी भरपूर, मेहनत घेतली.
या वेळी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य, डाॅ.रविंद्र गावंड,पुरूषोत्तम पाटील, बी.जे म्हात्रे, किशोर म्हात्रे,गणेश खोत, कैलास पाटील, मिलिंद पाटील,संजय पाटील, सतिश पाटील, संदेश गावंड, अनंत पाटील सहभागी झाले होते.सदर अभियान यशस्वी करण्यास समन्वयक म्हणून कुमार आदिनाथ पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडली.