दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रभाग क्र.१० मध्ये विकासकामांचे उद्घाटन
पनवेल महानगरपालिकेच्या विरोधात बेमुदत उपोषणास प्रभाग क्र.१० चे नगरसेवक रविंद्र अनंत भगत ४ दिवस बसले असता.उपोषणा वेळी पनवेल महानगरपालिकेने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता पार पडली.पनवेल महापालिका कळंबोली प्रभाग क्र.१० मध्ये नगरसेवक रविंद्र अनंत भगत यांच्या पुढाकाराने विविध विकासकामांचे मंगळवार (२ नोव्हेंबर) रोजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या वेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, पनवेल महानगरपालिका नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक विजय खानावकर,महाविकास आघाडीचे प्रमुख नेते,कार्यकर्ते आदी उपस्थित होते. पनवेल महानगरपालिका कळंबोली गावातील विविध विकास कामांचे उदघाटन आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
कळंबोली प्रभाग क्र.१० मधील आदिवासी वाडी मधील गटारे, ड्रेनेज लाईन व रस्ते काँक्रीट तसेच कळंबोली गावातील स्मशानभूमी सुशोभीकरण,कळंबोली गावातील श्रीपाद भगत ते बैठक हॉल नवीन रस्ता,कळंबोली गाव स्मशानभूमी ते शर्मा बेकरी पर्यंत नवीन रस्ता,महेश मोहिते घर आणि चाळ ते महिला मंडळ कार्यालय पर्यंत नवीन रस्ता आणि कळंबोली नारायण जाधव चाळ ते कातकर वाडी येथे नवीन गटाराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले, ‘नागरिक हा केंद्रबिंदू मानून विकासकामे झाली पाहिजेत. असे झाल्यास कळंबोली गावाचा आणि शहराचा खऱ्या अर्थाने विकास होईल. त्या शहरातील मैदाने, रस्ते, उद्याने ही सुनियोजित व शहराच्या सौंदर्यात भर पाडणारी असायला हवीत. यापुढेही आपले शहर हरित राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत बाळाराम पाटील यांनी व्यक्त केले.