माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदी कृष्णा पाटील तर उपाध्यक्षपदी अनुरुद्र पाटील यांची निवड.
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )उरण तालुक्यातील पुर्व विभागातील पिरकोण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी कृष्णा पाटील तर उपाध्यक्षपदी अनुरुद्र पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील पिरकोन गावचे रहिवाशी कृष्णा पाटील यांनी समाजातील गरजू गोरगरीब जनतेला त्यांच्या अडीअडचणीत नेहमी मदत केली आहे. कोरोना काळातही अनेकांचे प्राण त्यांनी वाचविले आहे. माणुसकीच्या दृष्टीकोणातून ते प्रत्येकाला मदत करत असतात. सर्वाशी मिळून मिसळून असतात.
उरण तालुक्यातील पूर्व विभागातील पाले या छोट्याशा गावात जन्मलेल्या अनुरुद्र पाटील यांनी पिरकोन येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात आपले शिक्षण घेतले.अनुरुद्र पाटील हे शांत, मनमिळाऊ, प्रेमळ स्वभावानी पुर्व विभागात प्रसिद्ध असून ते एक आदर्श ग्रामसेवक म्हणून शासकीय सेवेत रुजू आहेत. उरण तालुक्यातील,परिसरातील गोरं गरीब मुलांनी, विद्यार्थ्यांनी उच्च दर्जाचे शिक्षण घेऊन कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी सक्षम व्हावे यासाठी ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
पिरकोण येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष पदी कृष्णा पाटील तर अनुरुद्र पाटील यांची उपाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड झाल्याने विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, विविध पक्षांचे पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्यासह पालक, विद्यार्थी वर्गाने कृष्णा पाटील,अनिरुद्ध पाटील यांचे अभिनंदन केले आहे.