गोशीन रियूचा 33 वा कराटे कॅम्प संप्पन्न.
उरण दि 15(विठ्ठल ममताबादे )
गोशीन रियू कराटे असोसिएशन इंडियाच्या वतीने अक्षर धाम फार्म हाऊस आवलीचा मळा, तालुका पनवेल जिल्हा रायगड येथे 33 वा कराटे राष्ट्रीय कॅम्प दिनांक 10 ते 14 नोव्हेंबर 2021रोजी आयोजित करण्यात आले होते.या कॅम्प मध्ये 50 विदयार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये अनेक खेळाची ट्रेनींग देण्यात आली. तसेच अनिश चंद्रहास पाटील व मानसी नितीन ठाकूर यांना फस्ट डिग्री ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आला. व या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे दिलीप शेठ घरत, सुरेश पांडव हे होते. शिहान राजुकोली , आनंद खारकर, महेंद्र कोळी, गोपाळ म्हात्रे, संतोष मोकळ,राकेश म्हात्रे, अमिता घरत, अमिषा घरत, सुजित पाटील, प्रीतम मोकळ, सुलभा कोळी, अपर्णा मोकळ यांनी या कॅम्पसाठी मोलाचे सहकार्य केले.