शिवसेना पनवेल शहर तर्फे आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद….११५ नागरिकांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ…
पनवेल, दि. २१ ( अनिल कुरघोडे) : – शिवसेना पनवेल शहर व महिला आघाडी तसेच खारघर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने आयोजित मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, सदर शिबीर पनवेल येथील लाईन आळी, हनुमान मंदिरात संपन्न झाले. यावेळी ११५ नागरिकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
सदर आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी पनवेल शहर महिला आघाडीच्या उपशहर संघटिका उज्वला गावडे, शाखा संघटिका सुचिता शिर्के शहर शाखा प्रमुख अभिजित साखरे यांच्या पुढाकाराने व खारघर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉ. सरबजीत सिंग कोली, सागर गुंडेवार, बादल तिवारी, सायली वाघमारे,जावेद मणियार, दिनेश नामे, देवदत्त, सिस्टर सायली परब, तसेच श्री हनुमान मंदिर देवस्थान आदींच्या बहुमूल्य सहकार्याने संपन्न झाले, यावेळी शुगर, ब्लड प्रेशर, बी. एम.आय, वजन, फिजिशियन व गायनक कन्सलटिंग तसेच जनरल चेकअप व ब्लडटेस्ट मध्ये ५०% सूट देण्यात आली होती.
या कार्यक्रमाप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, महानगर संघटक प्रथमेश सोमण,उपमहानगर प्रमुख दीपक घरत, यतीन देशमुख, शहरप्रमुख अच्युत मनोरे,शहर संघटक प्रवीण जाधव, उपशहर प्रमुख राहुल गोगटे, अनिल कुरघोडे, महिला आघाडीच्या उपतालुका संघटिका सुनंदा पाटील, हर्षाली पराईकर, नीलिमा कुरघोडे, प्रतीक्षा कुरघोडे, उर्मिला कुरघोडे,योगिता कुरघोडे, वैष्णवी कुरघोडे, युवासेनेचे विधानसभा अधिकारी पराग मोहिते, निखिल भगत, किरण तावदरे, प्रसाद पटवर्धन, अमर पटवर्धन, सुमित दसवते, प्रमोद कुरघोडे, संकेत बुटाला, कपिल कुरघोडे, निनाद दामले, राकेश टेमघरे, भावेश शिंदे, गौरव सावंत,मयुरेश कुरघोडे, साहिल मोरे, संकेत दसवते, विवेक पवार,आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.