मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांनी रहदारीस अडथळा ठरत असलेला खड्डा बुजवून घेतला.
राष्ट्रीय महामार्गाहुन पनवेल शहरात येणाऱ्या गार्डन हॉटेल जवळील रस्त्यावर खड्डा पडल्यामुळे रहदारीस अडचण निर्माण होत होती.महामार्ग आणि त्यात सिग्नल असल्याने शहरात येणाऱ्या आणि शहराबाहेर पडणाऱ्या वाहनांना वळण घेण्यास अडथळा येत होता,त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढत होते.याबाबतची तक्रार महापालिका अधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आली होती.पण बरेच दिवस या विषयावर कोणतीच कारवाही होत नसल्याने कार्यक्षम नगरसेवक विक्रांत पाटील यांनी कॉन्ट्रॅक्टरला सांगून काँक्रीट मागवून घेतले व स्वतः जातीने उभे राहून खड्डा बुजवून घेतला.आपल्या प्रभागातील समस्यांचे निरसन नगरससेवक विक्रांत पाटील त्वरित करून घेतात याबद्दल नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत.