तळोजा पोलीस ठाण्याच्या वपोनि पदी जितेंद्र सोनवणे यांनी स्वीकारला पदभार
पनवेल, दि.2 (संजय कदम) ः तळोजा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी जितेंद्र सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारल्यावर अनेकांनी भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तळोजा पोलीस ठाण्याचे वपोनि काशिनाथ चव्हाण यांची बदली नियंत्रण कक्ष येथे झाली असून त्यांच्या जागेवर धडाडीचे व कर्तव्यदक्ष असा लौकिक असलेले जितेंद्र सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. यावेळी पोलीस खात्यातील त्यांचे सहकारी मित्र, पोलीस कर्मचारी व अनेकांनी त्यांची भेट घेवून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.