श्री.वाघदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार
पनवेल /प्रतिनिधी :पनवेल तालुक्यातील न्हावे येथील श्री वाघदेवी मंदिराचे बांधकाम नुकतेच झाले असून या मंदिराच्या बांधकामासाठी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आर्थिक मदत केली होती. त्याबद्दल श्री वाघदेवी प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा गुरुवारी सत्कार करण्यात आला. या वेळी सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, भजन मंडळाचे अध्यक्ष हिरालाल पाटील, ग्रामसुधारक मंडळाचे माजी अध्यक्ष उत्तम म्हात्रे, गणेश ठाकूर उपस्थित होते.