कामगार नेते,महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड चालुच.
उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )
कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली असतांना उदयोगधंदे सुद्धा सांभाळणे कठीण जात आहे. अशा परस्थितीत सुद्धा कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना , व्यवस्थापण व कामगार यांची योग्य सांगड घालत कामगारांना स्वाभिमानाने जगता येईल असे प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा कोणताही परिणाम संघटनेच्या कामकाजावर झालेला नाही. महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाखाली दर वर्षी साधारणता संघटनेच्या माध्यमातून जवळ जवळ 20 ते 22 करार होत असतात.त्याप्रमाणे जानेवारी 2021 पासुनचा हा 12 वा करारानुसार भेंडखळ येथील हिंद टर्मिनल मधील मे. पिनाकल मारिन सर्व्हिस मधील कामगारांना तब्बल 7,500 रुपयांचा भरघोस पगारवाढ करण्यात आला. हा करार तीन वर्षाचा आहे. यामध्ये कामगारांना पहिल्या वर्षी 6000 (सहा हजार ), दुसऱ्या व तिसऱ्या वर्ष्या साठी प्रत्येकी 750( सातशे पन्नास )अशा प्रकारे करण्यात आला. त्याच प्रमाणे प्रत्येक कामगारास दरवर्षी 14%बोनस देण्यात येईल तसेच प्रत्येक कामगारांना 300,000 ( तीन लाख)चा मेडिक्लेम सुद्धा देण्यात आला आहे. त्याप्रमाणे प्रत्येक कामगारांस ऐरिअसच्या रूपाने 1 00,000 ते 1,25,000( एक लाख ते सव्वा लाख रुपये )मिळतील अश्या प्रकारचा ऐतिहासिक करार कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या ऑफिस मध्ये करण्यात आला. यावेळी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, संघटनेचे सरचिटणीस वैभव पाटील,संघटनेचे उपाध्यक्ष किरिट पाटील संघटनेचे संघटक योगेश रसाळ, रायगड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशर मॅन संघटनेचे उपाध्यक्ष मार्तंड नाखवा,कंपनी व्यवस्थापनातर्फे संतोष जैन (डायरेक्टर) कामगारांच्या वतीने लंकेश ठाकूर, प्रांजल भोईर, जयेश कडू, देवेंद्र ठाकूर,हरेश ठाकूर, मनोज पाटील, सर्वेश पाटील, रविंद्र पाटील संदेश भोईर, विशाल ठाकूर, मनोज ठाकूर.यावेळी उपस्थित होते. यावेळी सर्व कामगारांनी कामगारनेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले.