वाहतूक शाखेच्या वतीने कारवाईची मोहीम, रिक्षा चालकाने नियम पाळावे- वपोनि संजय नाळे
पनवेल दि.15 (वार्ताहर)- लॉकडाऊन मुळे रिक्षा चालक हतबल झालेला आहे. हळू हळू व्यवसाय पूर्व येत आहे सध्या पनवेल वाहतूक शाखा पनवेल आरटिओच्या वतीने कारवाई मोहीम सुरु होणार आहे तरी रिक्षा चालकांना भूर्दंड बसू नये या करिता नवी मुंबंई, पनवेल उरण, परिसरातील रिक्षा संघटनाच्या प्रतिनिधीची बैठक पोलीस उपायुक्त कराड व वाहतूक शाखेच्या वतीने घेण्यात आली.
सर्व रिक्षाचालक व मालक यांना महत्वाची सूचना यावेळी करण्यात आली. यात रिक्षा पासिंग, इन्शुरन्स पी यु सी गणवेश व आपले लायसन्स बँच नेहमी सहज दिसेल असे लावावा आर.टी.ओ व वाहतूक शाखे कडुन कडक तपासणी करून कडक कारवाई करण्यात येणार आहे. तरी आपण सावधगिरीने जबाबदारीने आपला रिक्षा व्यवसाय करावा जेष्ठ नागरिक ,गरोदर स्त्रिया,अंध अपंग ,शाळेतील मुलांना प्रथम प्राधान्य द्यावे. तसेच महाराष्ट्र राज्य व आपल्या राज्य बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवासी यांच्याशी सौजन्याने वागावे मिटर प्रमाणे भाडे घ्वावे असे उपायुक्त कराड यांनी निर्देश दिले. आर. टी ओ चे दंड भरमसाठ वाढ झालेली आहे. त्यामुळे आपण आपल्या गाडीचे पेपर वेळेत पुर्ण करून घ्यावेत रिक्षा रांगेत लावुनच प्रवासी घ्वावे वाहतूक सिग्नल झेब्रा काँर्सीग नो पार्किग गेट समोर गाडी लावु नये तसेच व्यसन करून कधीही वाहन चालवु नका असे पनवेल वाहतूक वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे यांनी या वेळी संघटना प्रतिनिधीना या वेळी सूचित करण्यात आले. रिक्षा चालकांना कारवाई होण्या अगोदर माहित दिल्याने रिक्षा चालक सर्व नियम काटे कोर पाळतील असा रिक्षा संघटनेच्या पदाधिकारी यांनी विश्वास दिला. या बैठकीमध्ये या वेळी पनवेल उरण नवी मुबंई येथील रिक्षा संघटना उपस्थित होते.