रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील तळोजा येथील
पनवेल /प्रतिनिधी :महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ( महाराष्ट्र शासन अंगिकृत ) तळोजा औद्योगिक क्षेत्रातील दुरुस्ती विस्तारीकरण व उन्नतीकरण केलेल्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा उदघाटन समारंभ आज दिनांक १८ डिसेंबर रोजी उद्योग मंत्री सुभाष देसाई ह्यांच्या हस्ते पार पडला .
एम . आय.डि. सी सीईटीपी (CETP ) चे बांधकाम अंदाजे ७५ कोटी खर्च करून काम पूर्ण करण्यात आले आहे.
या नवीन सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा उपयोग सीईटीपी ( CETP) मधील कारखान्यामधून बाहेर पडणारे रासायनिक तसेच मच्छी चे पाणी शुद्ध करण्यासाठी होणार आहे.
सध्या बंद असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा उपयोग सीईटीपी ( CETP) कारखान्यामधून बाहेर पडणारे रासायनिक तसेच मच्छी च्या पाण्यावर प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे ते प्रदूषित पाणी कासाडी नदीमध्ये सोडले जात आहे.
त्यामुळे मच्छीवर व्यवसाय करणारे तसेच आजूबाजूच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
तळोजा औद्योगिक क्षेत्रातील नव्याने दुरुस्ती विस्तारीकरण व उन्नतीकरण केलेल्या सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचा नक्कीच प्रदूषण कमी करण्यास उपयोगी पडणार आहे.
यावेळी मा . म्हाडा अध्यक्ष शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व दि . बा . पाटील प्रकल्पग्रस्त
समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील , आमदार बाळाराम पाटील , राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील , समाजवादीचे नेते अनिल नाईक , नगरसेवक अरविंद म्हात्रे आदी उपस्थित होते .
यावेळी उद्योगमंत्र्याना महाविकास आघाडीच्या वतीने रामकी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून होत असलेल्या प्रदुषणाबाबत निवेदनही देण्यात आले .