सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे शौर्या तुला वंदितो कार्यक्रमात लष्करातील जवानांचा सन्मान.
उरण दि 19(विठ्ठल ममताबादे )सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संघटनेमार्फत दरवर्षी दिनांक 16 डिसेंबर व दिनांक 26 जुलै रोजी अनुक्रमे भारताचा पाकिस्तानवर विजय दिवस व कारगिल विजय दिवस या निमित्ताने शौर्य तुला वंदितो या कार्यक्रमांतर्गत लष्करातील जवानांचा सन्मान करून त्यांना शाल,श्रीफळ, मानचिन्ह व छत्रपती शिवरायांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात येतो. यंदा भारतीय विजय दिनाचे पन्नासावे वर्ष असल्याने महाराष्ट्रातील 50 शहरांमध्ये हा विजय दिवस शौर्या तुला वंदितो या कार्यक्रम साजरा करण्यात आला. सह्याद्री प्रतिष्ठान पनवेल तर्फे देखील हा कार्यक्रम गोखले हॉल- पनवेल येथे साजरा करून दिवंगत तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांना पुष्पांजली वाहून त्यांच्यासोबत शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.आर्मी शांताराम शिंदे,प्रविन पाटील,भरत कर्णेकर,समिर दुन्द्रेकर, किरण बोराडे,आदेश घरत, राजपूत, मनोहर येलमकर, बाबाजी गोळे या लष्करी जवानांचा सहयाद्री प्रतिष्ठान पनवेल विभागाकडून सन्मान करण्यात आला.यावेळी डॉ. शितलताई मालुसरे( नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे वंशज),रमेश रोकडे, देवेन्द सरदार,निलेश बढे,आदी मान्यवर उपस्थित होते.सह्याद्री प्रतिष्ठान चे शाहिर वैभव घरत हे अध्यक्षस्थानी होते तर कार्यक्रमाचे सुत्र संचालक सचिन ठाकुर यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना ज्ञानदेव म्हात्रे यांनी केली. सह्याद्री प्रतिष्ठान हिन्दुस्तान ची माहिती रितेश कदम यांनी दिली.पाहुण्यांचे आभार मयुर टकले यानी केले व सांगता यशस्वी पणे केली. सह्याद्री प्रतिष्ठानचे पनवेल विभागाचे पदाधिकारी सर्व दुर्गसेवक यांंनी परिश्रम घेतले. तसेच या कार्यक्रमाला संध्या दळवी निलम जाधव, मेघा पाटील, संगीता जाधव, ममता गुरव यांनी महत्वपूर्ण कामगिरी केली. या कार्यक्रमासाठी उरण, अलिबाग, अंबरनाथ, तळा, रोहा, श्रीवर्धन, खालापूर, ठाणे, मुंबई विभागातली दुर्गसेवक व दुर्गसेवकांची तसेच त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती.