25 वर्षापासुन आनंद साप्रंदायाचा प्रसार प्रचार करणारे गुरवर्य.बापु ढगे.विनामानधन शेकडो प्रवचने करणारे गुरवर्य .ढगे महाराज
पनवेल /प्रतिनिधी :आष्टी तालुक्यातील पारोडी येथील रहिवासी असलेले गुरुवर्य बापू ढगे यांनी आनंद संप्रदायासाठी आपलं आयुष्य वाहून घेतले असून गेल्या पंचवीस वर्षांपासून या आनंद संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार ते करत आहेत .गेल्या काही तीस वर्षांपासून एक रुपयाही मोबदला न घेता पदर खर्चाने प्रवचनाच्या ठिकाणी जाऊन प्रवचन करतात .आतापर्यंत त्यांची महाराष्ट्रभर शेकडो प्रवचन संपन्न झाले आहेत .अगदी प्रवचनाच्या ठिकाणी येण्या जाण्याचा खर्च सुद्धा ते घेत नसून पदर खुर्चीने याठिकाणी येते प्रवचन करण्यासाठी जातात .
वयाच्या पंचवीस व्या बंडू महाराज यांनी नाना महाराज पिंपळेकर यांना अनुग्रह दिला .गेल्या तीस वर्षांपासून या आनंद संप्रदायामध्ये बंडू महाराज यांनी स्वत ला वाहून घेतले आहे .सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी समाजाला भक्तिमार्ग दाखवून जीवनामध्ये चांगलं वागण्याचा संदेश ते आपल्या प्रवचनांमधून नेहमी देतात
आष्टी तालुक्यातील पारोडी परिसरातील शेतकरी सर्वसामान्य जनतेला आनंद संप्रदायाच्या माध्यमांतून सतमार्ग दाखवण्याचा कार्य बापू ढगे करत आहेत .संतांनी सांगितल्याप्रमाणे संसार करून ईश्वर नावाचं चिंतन केलं पाहिजे .संसाराचा त्याग करुनच आध्यात्म मार्ग स्वीकारता येतो, असे नाही तर संसार करुनही अध्यात्म करता येते हे बापू ढगे महाराजांनी दाखवून दिला आहे .आतापर्यंत त्यांचे मुंबई पनवेल नाशिक बीड असे महाराष्ट्रभर प्रवचनाचे कार्यक्रम संपन्न झाले आहेत .या प्रवचनांमधून त्यांनी लोकांना भक्तिमार्ग दाखवून ईश्वर नावाची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे .आनंद संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असून प्रत्येक वर्षी बोरुडी या गावामध्ये आनंद सांप्रदायाचा फार मोठा मेळावा भरवण्यात येतो बंडू महाराज कुडके यांची पुण्यतिथी दरवर्षी बोरुडे या गावात मोठ्या उत्साहात साजरे गुरुवर्य श्री.बापू महाराज ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाते .यानंतर संप्रदायाच्या मेळाव्यासाठी अनेक विविध भागातून लोक याठिकाणी येत असतात .