शेकापच्या महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा पाटील यांनी विद्यार्थी मैत्रिणींना दिल्या सायकली.
शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख सौ चित्रलेखा पाटील यांच्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील राजापूर आणि मोरा येथे विद्यार्थिनींसाठी मोफत सायकलचे वाटप केले गेले.
शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या हस्ते सायकलींचे वितरण विद्यार्थिनींना केले गेले.
सावित्रीच्या लेकी शिकून भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढे आल्या पाहिजेत या कारणे सौ चित्रलेखा पाटील यांनी आजवर 4000 विद्यार्थी मैत्रीणीना सायकलींचे वाटप केले असून या मोहिमेच्या शृंखलेत या उपक्रमाची भर पडली आहे.
आपल्या हक्काच्या सायकलीवरून वाऱ्याशी स्पर्धा करत निघालेल्या सावित्रीच्या लेकींच्या चेहऱ्यावर समाधान दिसल्याचे सांगत, याही पुढे अश्या मोहिमा राबवणार असल्याचे सुतोवाच सौ चित्रलेखा पाटील यांनी केले.