अबोली महिला रिक्षा चालकाचा रंगला हळदीकुंकू कार्यक्रम
पनवेल /रायगड :
संक्रात झाली कि महिला मंडळ ची लगबग सुरु होते, सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू कार्यक्रम सर्वत्र महिला एकत्र येऊन आयोजित करत असतात. असंच महिला रिक्षा चालक यांचा हळदी कुंकू रंगलेला पहिला मिळाला. कुटूंबाचे उदरनिर्वाह करण्यासाठी महिला सुद्धा पुरूषाच्या खांद्याला खांदा देऊन महिला पुढे आल्या आहेत, त्यात अबोली महिला चालक पनवेल मध्ये अग्रेसर आहेत,घरातील काम करून आपले कुटुंब सांभाळून रिक्षा व्यवसाय करतात. रोजच्या धावपळीतच्या जीवनामध्ये एकमेकींना मनमोकळे पणाने बोलायला वेळ नसल्याने अबोली महिला रिक्षाचालकांनी नवीन पनवेल येथील गार्डन मध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन केले. यात अनेक खेळ घेण्यात आले सगळ्यां एकत्र आल्याने सर्व महिल्यांच्या चेऱ्यावरचा आनंद दिसून येत होता हळदी कुंकू कार्यक्रमाच आयोजन अध्यक्ष- सौ.शालिनी गुरव सौ.ललिता राऊत यांनी केले होते या वेळी अबोली महिला रिक्षा चालक
सौ.आशा घालमे सौ.सुनिता सौ.जाधव आश्विनी शितोळे सौ.सुनिता पवार सौ.सीमा नरोडे सौ.आणिता पाटली सौ.जयश्री देशमुख सौ.वर्षा राजगुडे सौ.श्रुषाली रोडगे सौ.मंगल पाटील सौ.कमल घोलप सौ.वर्षा धरणे सौ.आणिता डावरे आदि महिला उपस्थित होत्या.