क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्या अध्यक्षपदी केवल महाडिकयांची निवड
पनवेल /रायगड :संतोष आमले 9220403509
पनवेल तालुक्यासह नवी मुंबई मधील परिसरातील जीवावर खेळून बातम्या प्रसिद्ध करण्यासाठी अग्रेसर असणाऱ्या पत्रकारांची संघटना म्हणून क्रियाशील प्रेस क्लब पनवेलची ख्याती सर्वत्र आहे. या संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी संस्थेचे संस्थापक विजय कडू, तसेच संस्थेचे मावळते अध्यक्ष अकबर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडली. यावेळी पार पडलेल्या सभेमध्ये नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली, यामध्ये कोकण संध्या वृत्तसमूहाचे मुख्य संपादक केवल महाडिक यांची अध्यक्षपदी तर कार्याध्यक्षपदी सहिल रेळेकर यांची निवड करण्यात आली. या सभेमध्ये क्रियाशील प्रेस क्लबच्या माध्यमातून महिलांचे संघटन कायम ठेवून नारी शक्तीचा पुन्हा एकदा सन्मान करण्यात आला आहे.
पत्रकारिता क्षेत्रामध्ये पदार्पण करून पत्रकारितेतील विविध संघटनांच्या माध्यमातून काम करीत असताना एक प्रसिद्धी प्रमुख ते प्रवाहातील मुख्य संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंतचा प्रवास केवल महाडिक यांनी पार केला. अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून समाज हिताचे कार्य त्यांनी केले आहे. आता क्रियाशील प्रेस क्लब पनवेलच्या अध्यक्षपदाची धुरा केवल यांच्या हाती आल्यामुळे परिसरातील नागरिकांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय मिळवून देवून गोरगरिबांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबविणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
तालुक्यातील आदिवासी वाड्या, वृद्धाश्रम आणि दुर्बल घटकांना मदत करण्यासह संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील. असा विश्वासही यावेळी संघटनेचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी महिला आघाडी प्रमुख पत्रकार धनश्री सट्टा यांनी बोलताना पनवेल प्रेस क्लब बाबत कृतज्ञता व्यक्त केली, क्रियाशील प्रेस क्लब पनवेलचे संस्थापक विजय कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आलेल्या नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी केवल महाडिक, कार्याध्यक्ष पदी साहिल रेळेकर, उपाध्यक्षपदी क्षितिज कडू, सरचिटणीस पदी चंद्रकांत शिर्के, सह चिटणीस पदी असीम शेख, कोषाध्यक्षपदी विशाल सावंत, महिला आघाडी प्रमुख धनश्री सट्टा, प्रसिद्धी प्रमुख ओमकार महाडिक, तर सल्लागार पदी विजय कडू, अकबर सय्यद आणि सदस्यपदी अनिल राय, संतोष वाव्हळ, प्रदीप ठाकरे, किरण बाथम, विकास पाटील, प्रदीप ठाकरे, राज भंडारी या सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी संघटनेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ सर्व पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.