उरण तालुका काँग्रेस तर्फे बॅरिस्टर अंतूले यांना आदरांजली.
प्रतिनिधी / शीतल पाटील
उरण दि 9(विठ्ठल ममताबादे )कोकणचे भाग्यविधाते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बॅरिस्टर ए आर अंतूले यांच्या जयंती निमित्त उरण तालुका काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस कार्यालय उरण शहर येथे बॅरिस्टर ए आर अंतूले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, शहराध्यक्ष प्रकाश पाटील, सेवादल अध्यक्ष कमळाकर घरत यांनी बॅरिस्टर अंतूले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आठवणींना आपल्या मनोगतातून उजाळा दिला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना हा काँग्रेस मुळे वाढला आहे असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मोदी यांचा भरपूर समाचार घेतला.
कोकण विभाग अल्पसंख्यांक उपाध्यक्ष अमरीन मुकरी, मच्छिमार नेते मार्तंड नाखवा ,रायगड जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, जिल्हा सरचिटणीस -गणेश सेवक,रायगड जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस -जितेश म्हात्रे, अल्पसंख्यांक रायगड जिल्हाध्यक्ष अकलाख शिलोत्री, ओबीसी सेल रायगड जिल्हाध्यक्ष -उमेश भोईर, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे, तालुका कार्याध्यक्ष चेतन पाटील, महिला तालुकाध्यक्ष रेखा घरत, तालुका उपाध्यक्ष निर्मला पाटील,उरण तालुका सरचिटणीस नदाफ अकबर,तालुकाध्यक्ष सेवा दल -कमळाकर घरत,तालुका उपाध्यक्ष सेवादल -जयवंत पडते,शहराध्यक्ष प्रकाश पाटील, शहर महिला अध्यक्ष अफशा मुकरी, युवक काँग्रेस उपाध्यक्ष उरण शहर -रविंद्र मढवी, शहर उपाध्यक्ष मोहन सिंह, उपसरपंच खोपटे -सुजित म्हात्रे, केगाव काँग्रेस गाव अध्यक्ष सदानंद पाटील आदी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बॅरिस्टर अंतूले यांना आदरांजली वाहिली.