पनवेल RTO ची प्रवासी वाहतूक करणाऱ्या रेपिडो बाईक वर कारवाई -श्री.अनिल पाटील
पनवेल/रायगड : सध्या अनेक दिवसापासून महाराष्ट्रभर ॲप च्या द्वारे ऑनलाईन बुकींग करून अवैध प्रवासी वाहतूक रॅपिडो बाईक च्या माध्यमातून होत असल्याचे निदर्शनात आलेले आहे. याची दखल घेऊन पनवेल परिवहन विभागातर्फे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या बाईकवर महाराष्ट्रात पहिली कारवाई पनवेल परिवहन विभागाचे अधिकारी श्री.अनिल पाटील साहेब यांच्या आदेशानुसार करण्यात आली आहे. सध्या रिक्षा परमिट घुले केल्यामुळे रिक्षाच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असून रिक्षाचालकांचा व्यवसाय अडचणीत आलेला आहे. त्यात अवैध बाईक प्रवासी वाहतूक आल्याने सर्वत्र रिक्षा चालकांमध्ये असंतोष निर्माण झालेला होता. रिक्षा संघटनेच्या वतीने परिवहन विभागाला पत्रव्यवहार करून सदर बाब पुराव्यानिशी परिवहन खात्याच्या निदर्शनात आणून दिल्यामुळे त्वरित यावर कारवाई करण्यात आली.कुठलेही प्रवासी वाहतूक करण्याकरिता परमिट ची आवश्यकता बंधनकारक असल्यामुळे सध्यातरी अश्या बाईकला कुठलीही परवानगी परिवहन विभागकडून देण्यात आलेली नाही. पनवेल परिवहन विभागाच्या हद्दीतील अशा बाईकवर त्वरित कारवाई करण्यात येईल असे परिवहन विभागाचे अधिकारी माननीय श्री अनिल पाटील साहेब यांनी या वेळी सांगतले, पनवेल आर.टी.ओ ने केलेल्या कारवाई मुळे रिक्षा चालकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालेले असून, रिक्षाचालकांकडून अनिल पाटील साहेब यांचं कौतुक होत आहे