हरिग्राम ग्रा पंचायत उपसरपंच पदी सौ राजश्री ताई दिपक घरत यांची बिनविरोध निवड
पनवेल /रायगड :हरिग्राम पनवेल – शुक्रवार दिनांक 11 फेब्रुवारी 2022 रोजी झालेल्या हरिग्राम ग्रा पंचायत उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सौ राजश्री ताई दिपक घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली गेली पंचवीस वर्षे हरिग्राम ग्रामपंचायतवर शेकापची एकहाती सत्ता आहे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेचे हरिग्राम शाखा प्रमुख श्री दिपक घरत यांना ग्रामपंचायत निवडणुकीत शब्द दिला होता उपरपंच पदाचा तो शब्द शेतकरी कामगार पक्षाच्या नेते व पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व विदमान सदश्य यानी विदयमान ग्रामपंचायत सदस्या सौ राजेश्रीताई दिपक घरत यांना उपसरपंच पदी बिनविरोध निवडून देऊन पूर्ण केला आहे गेल्या पंचवीस वर्षात छोट छोट्या कुटुंबातील पदाधिकारी यांना शेतकरी कामगार पक्षाची एकनिष्ठ असल्याने 13 सरपंच व 10 उपसरपंच होण्याचा बहुमान मिळाल्याने हरिग्राम गावाचा विकास करण्यासाठी अविरतपणे सारेजन प्रामाणिकपणे प्रयत्न करतात ग्रामपंचायत हरिग्राम चा उत्पन्न कमी असतांना देखिल गेल्या अनेक वर्षापासून हरिग्राम गावाचा विकास चांगल्या पद्धतीने होत आहे या उपसरपंच निवडीसाठी उपस्थित मान्यवर हरिग्राम ग्रा पंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य महाविकास आघाडीचे सारे पदाधिकारी मंडळी उपस्थित होते तसेच पनवेल पंचायत समितीचे मा सभापती मा श्री काशिनाथ पाटील शिवसेना महानगर प्रमुख मा श्री रामदास शेवाळे साहेब शिवसेना नेते श्री रामदासदादा पाटील पंचायत समिती मा सभापती सौ वृषाली देशेकर जिल्हा परिषद सदस्य मा श्री विलासदादा फडके काॅग्रेस पक्षाचे युवानेते श्री तुषारदादा पाटील क्रांतिकारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री नामदेवशेठ फडके साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल तालुका अध्यक्ष श्री दर्शनभाई ठाकुर शिवसेना पनवेल तालुका प्रमुख मा श्री एकनाथशेठ म्हात्रे, नविन पनवेल शहर प्रमुख मा श्री बिंदासभाई ठोंबरे निवडणूक अधिकारी म्हणून केवाळे ग्रा पंचायत ग्रामसेवक श्री शेख साहेब उपस्थित होते आलेल्या मान्यवर मंडळीचे तसेच नविन उपसरपंच यांचे अभिनंदन ग्रामपंचायत हरिग्राम च्या वतीने करण्यात आले सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन हरिग्राम गावात गेली अनेक वर्षे शेतकरी कामगार पक्षाचे नेतृत्व करणारे पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मा श्री संतोष पाटील यांनी केले