मोहोपाडा येथील विनोद शर्मा रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा ,किमती मोबाईल केला परत
पनवेल /रायगड :
मोहोपाडा येथील स्वराज माळी हा अंबानी स्कूलचा विद्यार्थी असून त्याचा किमती मोबाईल सोमवारी दुपारच्या सुमारास रिक्षाने प्रवास करीत असताना हरविला.स्वराज लोधिवली येथून मोहोपाडा करीता रिक्षामध्ये प्रवास करीत असताना त्याचा पंचवीस हजार रुपये किंमतीचा व्हिओ कंपनीचा मोबाईल रिक्षामध्ये विसरला.हा मोबाईल विनोद शर्मां यांना रिक्षात सापडल्याने त्यांनी प्रामाणिकपणा दाखवून रिक्षा चालक विनोद शर्मा याने स्वराज माळी यांचा शोध घेतला.
व त्याला मोहोपाडा रिक्षा थांब्याजवळ बोलवून रिक्षा चालक मालक संघटनेच्या थांब्याजवळ सुपूर्द केला.यासाठी रिक्षाचालकांनी मोबाईल स्वराज माळी यास सापडण्यासाठी मदत केली.संघटनेच्यावतीने विनोद शर्मा यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करुन त्याचा सत्कार करण्यात आला.
रिक्षाचालक विनोद शर्मा यांचे संघटनेचे सल्लागार फुलचंद लोंढे यांनी कौतुक केले.