मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्युज चॅनलच्या कार्यालयाचा उदघाटन सोहळा संपन्न
पनवेल प्रतिनिधी- पनवेल येथे जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मानवी हक्क संरक्षण फेडरेशन व हिंदुस्तान 24 तास न्युज चॅनलच्या कार्यालयाचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने करण्यात आले. पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण,कर्जत, अंबरनाथ, आदी ठिकाणांहून अनेक नागरिक व पाहुणे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. जेष्ठ समाजसेविका रिजवाना दिदी यांच्या हस्ते मुख्य कार्यालयाचे तर हिंदुस्तान 24 तास न्यूजच्या स्टुडिओचे उदघाटन करंजाडे ग्रामपंचायत सरपंच रामेश्वर आंग्रे
यांच्या हस्ते करण्यात आले.तर मानवी हक्क संरक्षण फेडरेशन च्या कार्यालयाचे उदघाटन उद्योजक अबरार शेख यांच्या हस्ते करण्यात आले. मानवी हक्क संरक्षण फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदुस्तान 24 तास न्यूजचे मुख्य संपादक डॉ.मुनीर तांबोळी यांनी बोलताना सांगितले की, जिसे अपना अधिकार पता है, ऊस चुहे से शेर भी डरता है, प्रत्येक जिल्ह्यात मानव अधिकार जन जागृतीसाठी शिबीर आयोजित केले जाणार असून संपूर्ण भारतात सदस्य नोंदणी मोहीम राबविण्यात येणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहर पोलीस वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय नाळे, नायब तहसिलदार निकम,अंबरनाथ नगरसेवक चौधरी,वनविभाग अधिकारी, उद्योजक अबरार शेख,पोलीस उपनिरीक्षक शरद ढोले, करंजाडे सरपंच रामेश्वर आंग्रे, ग्रामसेवक प्रेमसिंह गिरासे, पोलीस पाटील कुणाल लोंढे, शेखर गायकवाड, राजेंद्र सोनार, रमण ठाकूर,शाहीन खान, शहनाझ खान, निलेश भगत, शब्बीर कोठारी, शिराज तांबोळी, सेवा निवृत्त विंग कमांडर राजेंद्र महानुभाव, विद्या सावंत,जुबेर तांबोळी, रोहित सरावते, अमोल इंगोले,महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. अनेकांनी आपले विचार मांडले. संस्था वाढविण्यासाठी प्रत्येक महिला आपल्या विभागात काम करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी जेष्ठ समाजसेविका रिजवाना दीदी, जयश्री माई सावर्डेकर, डॉ.स्नेहा देशपांडे, स्नेहल ओव्हाळ, रत्नप्रभा गोमासे, प्रेमा अपाचे, रोहिणी डिक्रूझ, शर्मिला नाईक,मनीषा बहिरा,आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी राष्ट्रीय कार्याध्यक्ष, संपादक श्रेयस ठाकूर, उपसंपादक राज सदावर्ते, प्रतिनिधी हितेंद्र निकम, सचिन भालेराव,विजय गायकवाड, इरफान मुजावर, इद्रिस शेख, मंगेश गायकवाड, मनोज आंबरे, गुरदीप सिंह, आदी मेहनत घेतली.शाल, सन्मानचिन्ह देऊन पाहुण्यांना सन्मानित करण्यात आले. हिंदुस्तान 24 तास व मानवी हक्क संरक्षण फेडरेशन च्या पुढील वाटचालीस अनेकांनी शुभेच्छा दिल्या.