खोनपा प्रशासनाने आश्वासन पुर्ण न केल्याने अखेर किशोर साळुंके यांनी उगारले उपोषणाचे हत्यार
खोपोली नगरपरिषद हद्दित मोठ्या प्रमाणात अनाधिकृत बांधकामे, वाढीव बांधकामे , बिल्डरांकडून भाडे तत्त्वावर देण्यात आलेले सदनिका, तसेच शहरातील दूकाने, माँल , दवाखाने , ढाबे, बार , शोरुम, मेडिकल , एटी.एम , शासकीय व निमशासकीय बँका , पतपेढ्या , आदींना भाडेकरु वाढीव घरपट्टी लावणे, शासकीय भुखंडांवरिल कब्जा, त्या जागेवरिल अनाधिकृत बांधकाम तसेच शहरातील बिल्डरांकडून बांधकाम परवाणगी नूसार इमारत उभी न करता शासकीय नियम धाब्यावर बसवून करण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, पार्कींगच्या जागेत बांधण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे, व सद्यास्थितीत सूरु असलेली बेकायदेशीर बांधकामे,अनेक वर्ष पडून असलेल्या कारखांदारांच्या व बिर्डरांच्या मोकळ्या जागेला कर अकारुन महसुल जमा करणे, कंपन्यांमध्ये झालेली बांधकामे या विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन खोपोली प्रशासनाने दिले होते.परंतू त्या समस्या जैसे थे असल्याने अखेर बहुजन युथ पँथरचे खोपोली शहराध्यक्ष किशोर साळुंके हे खोपोली नगरपरिषदे समोर उपोषण करणार आहेत.बहुजन युथ पँथरचे खोपोली शहर अध्यक्ष तथा पत्रकार किशोर साळुंके यांनी वैयक्तिक पातळीवर खोपोली नगरीत सर्व्हे करुन शहरातीत वरिल विविध विषयांबाबत खोनपाला माहीती देवून गेल्या दोन वर्षांपासून याकामी सातत्याने या विविध सामाजिक विषयांबाबत शासकीय स्तरावर कारवाई व्हावी यासाठी तक्रारी अर्ज केलेत तसेच पुन्हा त्या तक्रार अर्जांवर स्मरण पत्र व माहीतीच्या आधिकारातून माहीती मागविण्यात आली असता या तक्रार अर्जांना उडवाउडवीची उत्तरे देत अर्जांना केराची टोपली दाखविली.
आपल्या पत्रांना न्याय भेटत नसल्याने किशोर साळुंके यांनी दि,२६ जानेवारी २०२२ रोजी खोपोली नगरपरिषदे समोर अमरण उपोषण करण्याचे ठरवून शासनदरबारी तसा पत्रव्यवहार केला होता.या उपोषणाच्या अर्जानंतर खोपोली पालिकेचे मुख्याधिकारी दुरे यांनी उपोषण करते किशोर साळुंके व शहरातीत पत्रकारांनासोबत चर्चा करुन सर्व समस्या दूर करु , साळुंके यांनी केलेल्या प्रत्येक अर्जानूसार कारवाई करण्याचे आश्वासन देवून तसे पत्र उपमुख्याधिकारी यांच्या सहिनिशी दिल्याने , त्या पत्राचा आणि सदर आधिकार्रांच्या विनंतीचा मान ठेवून साळुंके यांनी दि.२६ जानेवारीचे उपोषण तात्पूर्ते स्थगित केले होते,परंतू बरेच दिवस उलटूनही खोपोली नगरपरिषदेकडून आश्वासन पुर्ण केले गेले नाही. वरिल विषयांबाबत पुन्हा स्मरणपत्रही दिले.पालिका अधिकार्यांंनी या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केल्याने अखेर विविध मागण्यांसाठी अखेर किशोर साळुंके यांनी दि.०८ मार्च २०२२ रोजी उपोषण करणार असल्याचे पत्र बहुजन युथ पँथरचे जिल्हाध्यक्ष सुशीलभाई जाधव व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत खोपोली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनुप दुरे यांच्याशी चर्चा करुन जमा केले. दि. ०८ मार्च रोजी होणारे उपोषण हे आर नाही तर पार ची लढाई असल्याचे किशोर साळुंके यांनी सांगितले असून बहुजन युथ पँथर संघटनेसह खोपोली शहरातीत विविध सामाजिक संघटना , धार्मिक संघटना , पत्रकार संघटना , शहरातील नागरिक व मित्रपरिवारांचा या उपोषणास जाहीर पाठिंबा असल्याचे कळविले आहे.
खोपोली नगरपरिषदेचे बरेच अधिकारी मुजोर झाले असून गेंड्यांची कातडी पांघरुन सामान्य जनतेचा आवाज दडवून बिल्डर व धनदांडग्यांना अर्थपूर्ण पाठीशी घालत शासनाचा लाखो करोडो रुपयांचा महसुल बुडवत असून ही रक्कम त्या अधिकार्यांकडून वैयक्तिक रित्या वसूल करुन माझ्या तक्रार अर्जांनूसार त्वरित कारवाई व्हावी यासाठी ते उपोषण करणार आहेत.