*जप्त केलेला मुद्देमाल नष्ट करताना झाला स्फोट*
*तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी*
महाड/प्रतिनिधी
दि.८ मार्च २०२२ रोजी महाड तालुक्यातील कांबळे तर्फे महाड या गावालगत पोलिसांनी जप्त केलेला जुना विस्फोटक मुद्देमाल नष्ट करत असताना झालेल्या स्फोटात दोन पोलिस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाले आहेत. दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांवर महाड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून मुंबई येथे हलवण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार महाड औद्योगिक पोलीस ठाण्यांमध्ये पूर्वी जप्त केलेला विस्फोटक मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाल्यानंतर आज दिनांक 8/03/2022 रोजी BDDS पथक रायगड अलिबाग येथील PSI सय्यद व स्टाफ असे माणगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नो.11 /2013 या गुन्हयातील जप्त मुद्देमाल जिलेटीन, व डिटोनिटर वगैरे मुद्देमाल हा नाश करण्याचा आदेश मिळाल्याने हा मुद्देमाल दि. 8/3/2022 रोजी संध्याकाळी 06.45 वाजण्याच्या सुमारास इसाने कांबळे हद्दीत जावेद ईसाने याच्या क्रशरच्या मागे नष्ट करीत असताना ब्लास्ट झाला.
बॉम्बशोधक पथकातील HC/1131 आशिर्वाद महादू लडगे वय-45, PN/1200 रमेश राघो कुथे वय-36 हे दोघे गंभीर झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने ग्रामीण रुग्णालय, महाड येथे औषधोपचार करून पुढील उपचाराकरिता “एमजीएम हॉस्पिटल, मुंबई” येथे पाठविण्यात आले आहे तसेच पोलीस नाईक 2353 राहुल महादेव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली असल्याने त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालय, महाड येथे औषधोपचार करण्यात आलेले आहे, त्यांची तब्येत स्थिर आहे.स्फोटामुळे परिसरातील कांबळे तर्फे महाड आकले भोराव आदि गावा मध्ये मोठे दनके बसले. या धक्क्याने गावातील घरेदेखील हादरली असल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. आवाज होताच गावातील नागरिक घाबरून घराबाहेर पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी, प्रांताधिकारी प्रतिमा पुडलवाड, तहसीलदार सुरेश काशीद आदींनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली.
सदर घटना घडत असताना सुरक्षेचे उपाय योजना केली होती अगर नाही याबाबत स्थानिक नागरिकांनी देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे