राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तर्फे महिलादिना निमित्त कर्तृत्ववान महिलांचे सन्मान.
खोपोली /प्रतिनिधी : शीतल पाटील
महिलादिना निमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून खोपोली शहरात सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे सन्मान करण्यात आला
खोपोली शहरात जागतिक महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी संपर्क कार्यालयामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमांमध्ये सौ. ऍड. रूपाली दाभाडे (रायगड जिल्हा निरीक्षक) तसेच सौ. सुमन अवसरमल (माजी नगराध्यक्षा खो न प ) यांच्या उपस्थितीमध्ये आणि सौ. सुवर्णा मोरे (खोपोली शहर महिला शहराध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात माजी नगरसेविका केविना गायकवाड, माजी नगरसेविका गायकवाड, माजी नगरसेविका वैशाली जाधव या ही उपस्थित होत्या. कार्यक्रमांमध्ये मेहंदी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, संगीत खुर्ची अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.खोपोलीतील सर्व महिलांनी विविध स्पर्धेमध्ये मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आनंद घेतला . कार्यक्रमाचे सूत्र संचालन रश्मी नटे यांनी केले. स्पर्धेमध्ये विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचे सत्कार करण्यात आले. सदर कार्यक्रमात परीक्षक सुनिता गायकवाड, कुसुम सोलंकी लाभले.तसेच माजी नगराध्यक्ष दत्तजीराव मसूरकर, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल शहर अध्यक्ष मनेश यादव युवक अध्यक्ष अतुल पाटील पत्रकार संदीप ओव्हाळ, पत्रकार प्रशांत गोपाळे यांनी ही कार्यक्रमास येऊन शुभेच्छा दिल्या .
स्पर्धेतील विजेते –
मेहंदी स्पर्धा- सेजल भुजवा
पाक कला- प्रज्ञा महाडिक, रूपा ओव्हाळ
वेशभूषा -शिवाजी मशालकर, वैशाली भोसले
संगीत खुर्ची- कोमल संचिता शेलार
शहर कार्यकारिणी –
प्रियंका मोरे जयश्री डोंगरे दिपाली भोसले वैशाली भोसले प्राजक्ता शिंदे अंजू सरकार प्राजक्ता शिर्के प्रज्ञा महाडिक सरोज मोरे रेखा जाधव संचिता भुवर अरुणा गायकवाड उर्मिला गायकवाड अश्विनी ढोले
सत्कार मूर्ती-
शीतल पाटील सारिका सावंत संतोषी म्हात्रे अनिता पवार राजेश्री गायकवाड अंकिता मोहिते सविता जाधव हिमाली मोरे कांचन बागुल संगीता रामचंद्र चव्हाण नेहा गुप्ता आशा गायकवाड सविता जाधव मीनल जाधव इशिका शेलार