*मालविडे क्रिकेट क्लब, आगाशी आयोजित क्रिकेट स्पर्धा अभिजीत सांगळे यांची प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती*
मालविडे क्रिकेट क्लब, आगाशी आयोजित टेनिस क्रिकेट स्पर्धा शुक्रवार दिनांक ११/१२/१४३ मार्च २०२२ या तीन दिवस आगाशी पूरापाडा ग्राउंड वर भरवण्यात आले होते या स्पर्धेच्या आयोजना निमित्त प्रमूख पाहुणे म्हणून ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, वसई विरार शहर महानगरपालिका माजी नगरसेविका रंजना थालेकर, परिवहन सदस्य स्वप्निल कवळी, सोमवंशी क्षत्रिय समाज माजी अध्यक्ष जयवंत कवळी, देवस्थान मंडळांचे ट्रस्टी माधव म्हात्रे, माजी क्रिकेट पट्टु प्रविण वर्तक, यूवक मंडळ सदस्य अनिल म्हात्रे, संदिप वर्तक व सामाजिक कार्यकर्ता दिलीप सांगळे असे मान्यवर उपस्थित होते. मालविडे क्रिकेट क्लब ने आयोजन केलेल्या स्पधैची रूपरेषा एक गाव एक संघ, ओपन संघ तसेच वाडवळ समाज संघ अशी असून पारितोषीकांची रूपरेशा प्रथम पारितोषिक ५५,५५५ व चषक, दुसरे पारितोषिक ३३,३३३/- व चषक, तिसरे पारितोषिक २२,२२२/- व चषक अशी आहे.
वसई तालुक्यांतील बहुतांश गावाने आपापले संघ इथे नोंदवले आहे. खेळाडूचा ऊत्साह पाहता १ ल्या सामन्यांची सुरूवात करताना ग्राउंड वर नारळ फोडण्याचा तसेच टोस उडवून सामना सूरू करण्याचा मान हा अभिजीत सांगळे यांनी करून सामन्यास सुरूवात केली.
वसई तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंना पुढे चांगली संधी मिळावी त्यांनी पूढे IPL, ICC सारख्या मोठ्या क्लब मध्ये खेळावे व त्यांनी वसई तालूक्याचे नाव भारतात पुढे न्यावे असे प्रतिपादन ॲाल इंडीया सिफेरर्स यूनियन चे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी केले.
मालविडे क्रिकेट क्लब या क्लब च्या स्वयंसेवकांनी कोवीड काळात झालेल्या मानसिक तणाव व खेळाडूंना चांगले प्रोत्साहन मिळावे म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले. या सामन्यांची सूरूवात झाली असून अंतीम सामना हा १३ मार्च ला सायंकाळी ४ वाजता ठेवण्यात आला आहे. त्यानंतर मान्यवर अभिजीत दिलीप सांगळे तसेच इतर मान्यवर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येतील.