ककल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटिल ह्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक
पनवेल /प्रतिनिधी :आज तळोजे येथे मा. म्हाडा अध्यक्ष, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार व दि. बा. पाटिल प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष श्री. बबनदादा पाटिल ह्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.. ह्यावेळी स्थानिक नागरिकांसह हजारो मुस्लिम बांधव तसेच KGP शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते..
सदर कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. शिरिष घरत, कॉंग्रेस जिल्हाप्रमुख श्री. आर. सी. घरत, राष्ट्रवादी सरचिटणीस श्री. सुदाम पाटील, जिल्हाध्यक्ष श्री. सतिश पाटील, उपजिल्हाप्रमुख श्री. रामदास पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रल्हाद केणी, भाजप नगरसेवक श्री. हरेश केणी, तालुकाप्रमुख श्री. एकनाथ म्हात्रे, उपमहानगरप्रमुख श्री. कैलास पाटील, श्री. दिपक घरत, कॉंग्रेसचे चिटणीस श्री. बबन केणी, राष्ट्रवादीचे ताहिर पटेल, युवासेना जिल्हा समन्वयक श्री. नितिन पाटिल आदी उपस्थित होते, शहरप्रमुख श्री. प्रदीप केणी, माजी शहरप्रमुख श्री. बाळा मुंबईकर, श्री. मिथुन मढवी आदी उपस्थित होते…..