अखंड हरिनाम किर्तन महोत्सवा चा सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या हस्ते शुभारंभ
पनवेल/प्रतिनिधि
प्रथमच करंजाडे नोड मध्ये,संत सेवा सांप्रदायिक मंडळ करंजाडे आयोजित अखंड हरिनाम किर्तन महोत्सव तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे उदघाटन करंजाडे ग्रामपंचायतीचे सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्याहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी करंजाडे ग्रामपंचायतीचे सदस्य मंगेश बोरकर ,भरत राणे, वंदना पोपट ,निलम भगत, शांताबाई राणे व मंडळाचे योगेश शिंदे, प्रमोद शिकारे, भास्कर खोसे, योगेश बांगर ,विनायक देशमाने विजय नरवडे ,प्रथमेश पुंडे देविदास पुंडे,अतुल गुंजाळ स्वप्नील भोर ,किरण हडवले बाबू भोसले , संजय शिकारे, मंगेश जाधव ,प्रमोद आवारी सचिन आवारी, गणेश हडवले तसेच डॉ संतोष जाधव तसेच मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी सरपंच रामेश्वर आंग्रे यांनी या आध्यत्मिक महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.