जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तरुण कार्यकर्त्यांचा मनसेत पक्ष प्रवेश.
उरण /प्रतिनिधी :
नवनिर्वाचित मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांच्या अध्यक्षतेखाली उरण विधानसभा उपाध्यक्ष सतीश बिपीन पाटील व जासई संघटक किरण दत्तात्रेय भाकुर्लेकर यांच्या नेतृत्वाखाली चिरनेर येथील विनीत पाटील, करण भाकुर्लेकर, रोहित म्हात्रे, साहिल परदेशी,विनीत मुंबईकर, अनिकेत म्हात्रे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. हा पक्ष प्रवेश सोहळा उरण तालुक्यातील कोप्रोली येथील कोप्रोली चौकात असलेल्या मनसेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, उपजिल्हा संघटक रोजगार सेना रितेश पाटील, उरण विधानसभा उपाध्यक्ष सतीश बिपीन पाटील, तालुकाध्यक्ष सत्यवान भगत, जासई संघटक किरण भाकुर्लेकर, राकेश भोईर, दिनेश हळदणकर, धनंजय मोरे, गणेश तांडेल आदी मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. संदेश ठाकूर जिल्हाध्यक्ष बनताच मनसे मध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे. जिल्हाध्यक्ष बनताच तरुणांचा कल मनसेपक्षाकडे वळला असून तरुणांचा पक्ष प्रवेश वाढतच चालला आहे.