पनवेल मध्ये शिवसेनेने केला किरीट सोमय्या यांचा निषेध; पुतळ्याचे केले दहन
पनवेल दि.०७ (वार्ताहर) : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वरील ईडी कारवाईचा निषेध म्हणून आज पनवेलमध्ये शिवसेना कार्यालयाजवळ जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली ईडीचा गैरवापर करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, तालुका संघटक भरत पाटील, विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, महानगर समनव्यक गुरुनाथ पाटील, तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उपमहानगर प्रमुख दीपक घरत, महिला उपजिल्हा संघटिका कल्पना पाटील, पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव, खांदा वसाहत प्रमुख सदानंद शिर्के, कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी, नवीन पनवेल शहर प्रमख यतीन देशमुख, कळंबोली शहर प्रमुख डी.एन.मिश्रा, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, पनवेल विधानसभा अधिकारी पराग मोहिते, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, ऍड. जगदाळे, अपूर्वा प्रभू यांच्यासह मोठ्यासंख्येने पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध करून संजय राऊत यांच्यावर करण्यात आलेल्या ईडी कारवाईचा निषेध करून पुतळ्याचे दहन करण्यात आले.
फोटो : जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये किरीट सोमय्या यांचा निषेध करून त्यांच्या पुतळ्याचे केले दहन