रामनवमी निमित्त कोप्रोली येथे विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
उरण दि 11(विठ्ठल ममताबादे )सालाबाद प्रमाणे यंदाही ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ (रजि 9/16) यांच्या सौजण्याने रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर दि 9/4/2022 व 10/4/2022 रोजी श्री साईबाबांच्या साईचरित्र पारायण व श्री सत्य नारायणाच्या महापुजेचे आयोजन गणपती मंदिर, कोप्रोली, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे करण्यात आले.
सकाळी 5 वाजता काकड आरती,6 वा मंगल स्नान,7 वा श्री साई चरित्र पारायण वाचन प्रारंभ, दुपारी 12 वाजता साईबाबांची मध्यानह आरती, दुपारी 3 ते 5 श्री सत्यनारायणाची महापूजा, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, सायंकाळी 6 वा साईबाबांची धूप आरती, सायंकाळी 6:30 ते 7 दर्शन सोहळा, सायंकाळी 7 ते 10 साई भंडारा(महाप्रसाद ), रात्री 9 वाजता साईगीतांचा तसेच भावगीत लोकगीतांचा मनोरंजनाचा कार्यक्रम, शिव व्याख्यान आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला जनतेचा उत्तम प्रतिसाद लाभला .भाविक भक्तांनी देवदर्शनाचा तसेच दोन दिवस चाललेल्या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.विविध क्षेत्रातील मान्यवरांनी देवदर्शन घेऊन सदर कार्यक्रमाचे कौतुक केले .रामनवमी निमित्त कोप्रोली येथे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॐ साई सार्वजनिक पदयात्रा मंडळ व ग्रामस्थ मंडळ कोप्रोली तसेच श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.