ॲथलेटिक्स स्पर्धेत उरणच्या योगा विथ पूनम जेएनपीटी उरण ग्रुपच्या खेळाडूंचे सुयश
उरण दि 13(विठ्ठल ममताबादे )रायगड जिल्हा ॲथलेटिक्स चंपियनशिप व राज्यस्तरीय निवड स्पर्धा एच एच ओ सी पिल्लई कॉलेज द्वारा आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत 1000 खेळाडू सहभागी झाले होते. त्यात योगा विथ पूनम ऍण्ड ॲथलेटिक्स उरण डाऊन नगर व जे एन पी टी चे खेळाडू सहभागी झाले होते.या खेळाडूंनी उत्तम कामगिरी बजावली.यामध्ये
1)व्ही. एम.श्रीलक्ष्मी – 100 मीटर धावणे प्रथम क्रमांक,लांब उडी मध्ये द्वितीय क्रमांक
2)राम चौहान- भालाफेक प्रथम क्रमांक तसेच गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक
3) गौरव प्रदीप पांडे गोळा फेक प्रथम क्रमांक आणि 100 मीटर हर्डल्स प्रथम क्रमांक
अशा प्रकारे विजय मिळविला.विजय झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची 21 ते 23 एप्रिल 2022 दरम्यान पिंपरी चिंचवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत निवड झाले आहे.स्पर्धकांनी उरण तालुक्याचे नाव उज्वल केले याबद्दल त्यांचे प्रशिक्षक पुनम चौहान व राम चौहान आणि प्रकाश जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. सर्व विजेते खेळाडू स्पर्धाकांवर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.