आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांच्या तर्फे काढण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर भव्य मिरवणुकीला उत्स्फूर्त प्रतिसाद
पनवेल, दि.15 (वार्ताहर) ः कामोठे वसाहतीमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आरपीआय (आठवले गट) जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी काढलेल्या भव्य मिरवणुकीमध्ये कामोठेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सदर मिरवणूक ही रायगड नव्हे तर नवी मुंबईतील एकमेव अशी भव्य दिव्य व सर्वधर्मीय सहभाग झालेली अशी मिरवणूक निघाली होती. यावेळी जगदीश गायकवाड यांच्यासह त्यांचे कुटुंबिय व भिमसैनिक मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. वाजत गाजत, ढोल-ताशा, डिझेच्या गजरात तसेच लाठी-काठीचे प्रदर्शन करीत कामोठे वसाहतीमधून ही मिरवणूक निघाली होती. संपूर्ण कामोठे वसाहतीमधून निघालेली ही एकमेव मिरवणूक होती. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयजयकाराने कामोठे दुमदुमले होते. या निमित्ताने विविध ठिकाणी, विविध सामाजिक संस्था संघटनेच्या माध्यमातून मिरवणुकीत सहभागी झालेल्यांना सरबताचे वाटप, नाश्ताचे वाटप करण्यात आले होते. या निमित्त आयोजित विविध स्पर्धेसंबंधातील माहिती जगदीश गायकवाड यांनी दिली.
कोट
समाजातील प्रत्येक जण आज या मिरवणुकीमध्ये सहभागी झाल्याने मनापासून आनंद होत आहे. तरुण पिढीने अधिक शिक्षण घ्यावे, उद्योग व्यवसाय करावा व समाजाचे नाव मोठे करावे असे आवाहन करीत यासाठी सर्वतोपरी मदत मी करीन, असे आश्वासन जगदीश गायकवाड यांनी याप्रसंगी दिले.
फोटो ः जगदीश गायकवाड यांच्यामार्फत काढण्यात आलेली मिरवणूक