वरिहा रावल हिने पटकाविला एलीट मिस इंडिया तर अनुपम चंदन डिवॅलीशिअस मिसेस इंडिया युनिवर्स 2022 चा किताब
पनवेल /प्रतिनिधी :
डिव्हेलिशिअस मिर्सेस युनिवर्स ह्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एलिट मिस इंडिया आणि मिर्सेस इंडिया युनिवर्स ह्यासारख्या मॉडेलिंग स्पर्धेमध्ये नवी मुंबईतील वरिहा रावल आणि अनुपम चंदन ह्या विजयी ठरल्या वरिहा रावल. यात वरिहा रावल हिने एलीट मिस इंडिया तर अनुपम चंदन हिने डिवॅलीशिअस मिसेस इंडिया युनिवर्स 2022 हा ’किताब पटकावला. याबद्दल त्यांच नवी मुंबईतून कौतुक होत आहे.
त्यातच दीपिका रावल ह्यांच्या लवकरच येऊ घातलेल्या फेस ऑफ नवी मुंबई ह्या मॉडेलिंग शो चे लाँच नुकतेच करण्यात आले. या संदर्भात ड्विेलिशिअसं मिर्सेस युनिवर्स चे नरेश मदान ह्यांनी संस्थेबद्दल माहिती देत विजेत्यांचे अभिनंदन केले.
यावेळी बोलताना मारिहा रावत हिने ह्या जिंकलेल्या ’किताबाचे सगळे श्रेय आपल्या आई वडील घरच्यांना दिले व अतिशय आनंदी असल्याचे सांगितले. तर आवड असेल तर माणूस आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो फक्त जिद्द आणि मेहनत असावी असे सांगत डीव्हेलीशीअसं मिर्सेस इंडिया ’किताब मिळवलेल्या अनुपम चंदन ह्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.