पिराजी चव्हाण यांना आर्थिक मदतीची गरज
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे )पिराजी गोविंद चव्हाण,पत्ता- द्रोणागिरी भवन समोर, घर नंबर -226, नाईक नगर, म्हातवली नागाव,ONGC समोरील झोपडपट्टी जवळ,उरण हे किडनीच्या आजाराने त्रस्त असून त्यांना किडनीची तातडीची गरज आहे.पिराजी चव्हाण यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या असून आठवड्यातुन तीन वेळा डायलिसिस करावे लागते. त्यांचे लवकरात लवकर ऑपरेशन करून मुलाच्या आईची किंडणी मुलाला द्यावी तर तो मुलगा वाचेल असे डी वाय पाटील हॉस्पिटल नेरूळ, नवी मुंबई येथील डॉक्टरांनी सांगितले आहे.नवी मुंबई मधील डॉ डी वाय पाटील हॉस्पिटल मध्ये पिराजी चव्हाण यांच्यावर उपचार सुरु आहेत.तरी ऑपरेशन साठी 8 लाख रुपये खर्च सांगितले आहे. त्याच्या घरची परीस्थिती वाईट आहे.घरची परिस्थिती हलाखीची आहे.तो घरातील कर्ता पुरूष आहे. तोच आजारी असल्याने घरावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.त्याची आई भंगार गोळा करून घर सांभाळते. त्या आईला एकुलता एक मुलगा आहे त्या आईने पदर पसरून आपल्या मुलासाठी मदतीचे हात मागितंले आहे तरी ज्यांना ज्यांना शक्य आहे असे दानशूर व्यक्तींनी एका आईच्या हाके साठी फुल ना फुलांची पाकळी मदत द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
पिराजी गोंविद चव्हाण यांचे बँक डिटेल्स:-
अपना सहकारी बँक लिमिटेड, उरण
अकॉउंट नंबर -055011100000380
IFSC CODE – ASBL 0000055
हे बँक खाते आहे.तसेच गुगल पे नंबर(Google pay) 9082218282 हा आहे.दानशूर व्यक्तींनी येथे मदत करावी अशी विनंती व आवाहन चव्हाण कुटुंबियांनी केले आहे.