*पनवेलमध्ये शिवसेनेकडून प्रभाग 14 येथे दावत -ए -इफ्तार* .
पनवेल/ प्रतिनिधी: दिनांक २० एप्रिल २०२२ रोजी शिवसेनेच्या वतीने प्रभाग क्रमांक १४ प्रेस्टिज गार्डन सोसायटी, येथे दावत-ए-इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.शिवसेनेचे पनवेल उपशहर प्रमुख अबरार मास्टर- कच्छी , प्रभाग क्रमांक १४ चे उपविभाग संघटक जुनैद पवार, शाखाप्रमुख नुरूल्ला वाईकर ,यांच्या पुढाकाराने या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमचे खास पाहुणे. मौलाना शाह अब्दुल गणी साहब व शिवसेना जिल्हा अध्यक्ष शिरीष घरात सहब , पनवेल महानगर प्रमुख रामदास शिवाळे साहेब,पनवेल महानगर संघटक एडवोकेट प्रथमेश सुमन साहेब,दीपक घरात साहेब ,भरत पाटील साहेब , पनवेल निरक्षक दिपक निकम साहेब ,जमील खान साहब , शेख इम्तियाज भाई,पनवेल शहर प्रमुख प्रवीण जाधव साहेब , यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक उपस्थित होते.