यशवंत नगरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते लोकार्पण
खोपोली / प्रतिनिधी – शीतल पाटील
शहरातील यशवंत नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले असून ऐतिहासिक क्षणाचे साक्षिदार होण्याची संधी मिळाल्याचे मत खा.आठवले यांनी व्यक्त केले आहे.
खोपोली नगरपालिका हाद्दीतील यशवंत नगर येथे भव्य संस्कार उभारावे यासाठी आरपीआयचे युवानेते प्रमोद महाडिक यांनी जगदीशभाई गायकवाड यांनी पाठपुरावा केला असता रायगड जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र उभारणीसाठी ५३ लाख मंजूर केले. दि.२५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री खा.रामदास आठवले यांंच्या वाढदिवसाचे औचित्य संस्कार केंद्राचे भूमिपूजन पनवेल महापालिकेचे उपमहापौर तसेच आरपीआयपक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष जगदीशभाई गायकवाड करण्यात आले होते.भव्यदिव्य इमारतीचे लोकार्पण सोहळा गुरूवार दि.२८ एप्रिल रोजी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी मुख्याधिकारी अनुप दुरे, आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष दत्तात्रेय मसुरकर, सुमन औसरमल, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, युवाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नरेश पाटील, माजी नगरसेवक मोहन औसरमल, किशोर पानसरे, धर्मानंद गायकवाड, प्रमोद महाडिक, आरपीआयचे शहर अध्यक्ष चिंतामणी सोनावणे, प्रवीण महाडिक, बाबू पुजारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि यशवंत नगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.