राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडिया मध्ये बदनामी कारक पोस्ट करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
पनवेल दि. १६ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडिया मध्ये बदनामी कारक पोस्ट करणाऱ्या तरुणाविरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
शहरातील किरण इनामदार या तरुणाने सोशल मीडियावर राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बदनामी कारक पोस्ट केल्याची माहिती राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील यांना मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद भगत , तुषार पाटील , शहाबाज पटेल ,श्रीधर केदारी बागल , रंजित नरुटे , किशोर साळुंके , राजू नलावडे , नितीन त्रिमुखे , हर्षल बडे , इम्रान सुभेदार आदी पदाधिकारांनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांची भेट घेऊन सदर घटनेचा निषेध करीत या तरुणावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी अशी मागणी केली .
कोट
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे आमचे दैवत असून त्यांची केलेली बदनामी आम्ही कदापि सहन करणार नाही, सदर तरुणाला अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील
फोटो – पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांना निवेदन देतांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सतीश पाटील यांना मिळताच त्याच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद भगत , तुषार पाटील , शहाबाज पटेल, श्रीधर केदारी बागल , रंजित नरुटे , किशोर साळुंके , राजू नलावडे , नितीन त्रिमुखे , हर्षल बडे , इम्रान सुभेदार आदी पदाधिकारी