बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या गुन्हेगारास गुन्हे शाखा कक्ष ०२ कडून अटक; आरोपीकडून ३,४७,१००/- रूपये किंमतीचे एकुण ०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत
पनवेल दि.२३ : नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल यांच्या कडून पनवेल रेल्वे स्टेशन, नवी मुंबई येथे बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विक्री करण्यास आलेल्या गुन्हेगारास अटक करण्यात आलेली आहे. सदर अटक आरोपी कडुन ३,४७,१००/- रूपये किंमतीचे एकुण ०४ अग्नीशस्त्र व चार जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालया मध्ये बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणारे गुन्हेगारवाई करण्याबाबत पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंह, सह पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, गुन्हे अपर पोलीस आयुक्त महेश घुर्ये, गुन्हे शाखेचे पोलीस उप आयुक्त सुरेश मेंगडे, गुन्हे शाखेचे सहा. पोलीस आयुक्त विनायक वस्त, यांनी वेळोवेळी आढावा घेवून विशेष मोहिम राबवुन बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणारे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून वेळीच प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिले होते. त्याअनुषंगाने एक इसम पनवेल रेल्वे स्टेशन परीसरात बेकायदेशिररित्या अग्नीशस्त्रांची विक्री करण्यासाठी येणार असल्याबाबत गोपनिय बातमीदाराकडुन गुन्हे शाखा यांना माहिती प्राप्त झाली होती. सदर माहितीचे अनुषंगाने पडताळणी करून कारवाई करण्याबाबत वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार गुन्हेशाखा कक्ष २, पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे दोन पथक तयार करून पनवेल रेल्वे स्टेशन परीसरात सापळा रचुन गोपाल राजपाल भारव्दाज, वय २२ वर्षे, व्य. बेकार, रा. नवोदय नगर, टेहरी विस्थापीत कॉलनी, साई मंदिर पार्कच्या जवळ, हरीव्दार, उत्तराखंड मुळ रा. ५३५८ नेहरू नगर, सहारनपुर, राज्य उत्तरप्रदेश यांस पळून जाण्याच्या तयारीत असताना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर अटक आरोपीतांकडे असलेल्या बॅग (रॉक) ची तपासणी केली असता यामध्ये देशी बनावटीचे ०४ अग्निशस्त्रे व ०४ जिवंत काडतुसे मिळून आली आहेत. सदर आरोपीताविरुध्द पनवेल शहर पोलीस ठाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरच्या गुन्हयाच्या तपासादरम्यान सपोनि संदिप गायकवाड, सपोनि. फडतरे, पोउपनि. पाटील, पोउनि वैभव रोंगे, पोहवा अनिल पाटील, पोहवा ज्ञानेश्वर वाघ, पोहवा प्रशांत काटकर, पोहवा मधुकर गडगे, पोहवा सचिन पवार, पोहवा रणजित पाटील, पोहवा तुकाराम सुर्यवंशी, पोहवा राजेश बैकर, पोना निलेश पाटील, पोना दिपक डोंगरे, पोना सचिन म्हात्रे, पोना रूपेश पाटील, पोना इंद्रजित कानु, पोना राहुल पवार, पोना प्रफुल्ल मोरे, पोशि संजय पाटील, पोशि प्रविण भोपी, पोशि विकांत माळी यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे.