आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर आदिवासी सेवा संघाचे अध्यक्ष, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार जाहीर
संतोष आमले
पनवेल तालुका / प्रतिनिधी
9220402509
नवी मुंबई, पनवेल मधून प्रकाशित होणारे दैनिक लोकांकित वृत्तपत्राचा सहावा वर्धापन दिन पनवेल येथे होणार असून वर्धापन दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. वृत्तपत्राबरोबर सामाजिक बांधिलकी म्हणून नाट्य क्षेञातील कलाकार, सामाजिक कार्यकर्ते यांना समाज भुषण, जीवन गौरव तसेच विविध माध्यमांतील पञकार यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
ठाणे, पुणे, नवी मुंबई व रायगड जिल्ह्यात आदिवासी समाजात अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार गणपत वारगडा यांना सामाजिक कार्याची पावती म्हणून राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गणपत वारगडा हे स्वतः आदिवासी समाजाचे असून समाजात जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी वयाच्या २१ व्या वर्षी साप्ताहिक, आदिवासी सम्राट नावंच वृत्तपत्र चालू केलं. एवढंच नाहीतर समाजामध्ये संघटन वाढावं आणि एकजूट रहावं व चळवळ उभी रहावी, याकरिता आदिवासी सेवा संघ, महाराष्ट्र राज्याची स्थापना केली.
वृत्तपत्राच्या व आदिवासी सेवा संघाच्या माध्यमातून सातत्याने गणपत वारगडा यांनी वेळोवेळी शासन दरबारी प्रश्न व उद्भवत असणा-या अडचणी मांडण्याचे काम करत आहेत. ठाणे, पुणे, नवी मुंबई, रायगड जिल्हामध्ये आदिवासी सेवा संघाच्या शाखा तयार केल्या गेल्या. त्याचबरोबर वैज्ञानीक युगांमध्ये डिलीट मिडीयावर भर देत ADIVASI News & Entertainment YouTube Channel चालु केले आहे. या सर्वांचा विचार करून सामाजिक कार्यकर्ते, पञकार गणपत वारगडा यांना राज्यस्तरीय समाज भुषण पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याने समाजातील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.