युवा सामाजिक संस्था जसखारने केले जे.एन.पी.टी. प्रशासन विरोधात एक दिवसीय उपोषण.
उरण दि 15उरण तालुक्यातील जसखार गाव हे जे.एन.पी. टी. प्रकल्पग्रस्त बाधित गाव आहे.युवा सामाजिक संस्था जसखार व ग्रामस्थांनी प्रशासनासोबत मागील अनेक वर्षे न्याय मिळावा यासाठी चर्चा केल्या.विविध मागण्यासाठी विविध पाठपुरावा केला होता. कायदेशीर पत्रव्यावहार सुद्धा केला होता.परंतु जेएनपीटी प्रशासनाकडून जसखार गावाला न्याय देण्यात आला नाही. जेएनपीटी प्रशासनाने आजपर्यंत जसखार ग्रामस्थांच्या कोणत्याही मागण्या मान्य केल्या नाहीत.म्हणून जसखार गावाला न्याय मिळावा यासाठी बुधवार दि. 15/6/2022 रोजी युवा सामाजिक संस्था जसखार या सामाजिक संस्थे तर्फे जे. एन. पी. टी. प्रशासना विरोधात एक दिवसीय उपोषण करण्यात आले.यावेळी सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी या उपोषणास जाहीर पाठिंबा दिला.
रत्नेश्वरी आईची मंदिराची जेएनपीटीने नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलामुळे दुरावस्था झालेली आहे. तरी त्याची संपूर्ण जबाबदारी जे.एन.पी.टी.ने घ्यावी. तसे लेखी स्वरूपात पत्र ग्रामपंचायतीकडे द्यावे. या प्रमुख मागणीसह एकूण 14 मागण्यासाठी एकदिवसीय उपोषण करण्यात आल्याची माहिती युवा सामाजिक संस्था जसखारने दिली.
यावेळी युवा सामाजिक संस्था जसखारचे अध्यक्ष हर्षल ठाकूर, उपाध्यक्ष गर्दीश म्हात्रे, सेक्रेटरी संदीप भोईर, खजिनदार मयूर तांडेल, सदस्य नितीन पाटील, निशांत ठाकूर, सचिन घरत, मेघनाथ ठाकूर, परेश घरत यांच्यासह गावातील ग्रामस्थ, महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात पाणी भरले किंवा कोणताही अनुचित प्रकार घडला तर याची जबाबदारी ही जे एन पी टी प्रशासनची असेल. तरी यापुढे येत्या काही दिवसात जसखार ग्रामस्थांच्या समस्या सोडविल्या नाही तर जे एन पी टी चेअरमन विरुद्ध तिव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच यापुढे कायदा सुव्यवस्था बिघडल्यास याला संपूर्ण पणे जे एन पी टी प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा युवा सामाजिक संस्था जसखारने यावेळी दिला.
युवा सामजिक संस्था आणि जसखार ग्रामस्थांनी जो लाक्षणिक उपोषण आणि जेएनपीटी विरुध्द जो लढा उभारला आहे त्यास पाठिंबा देण्यासाठी सकाळी पासूनच अनेक राजकीय , सामाजिक तसेच कला क्षेत्रातील मान्यवरांनी उपोषण स्थळी हजेरी लावून आपला पाठिंबा जाहीर केला संदेश भाई ठाकूर -मनसे जिल्हा अध्यक्ष, कॉ. भूषण पाटील JNPT ट्रस्टि, सत्यवान भगत
मनसे तालुका अध्यक्ष,महादेव घरत शिवसेना नेते,नीलेश घरत सरपंच ग्रामपंचायत डोंगरी,रूपेश धूमाल आगरी कोळी कराडी महाराष्ट्र अध्यक्ष, संदेश भगत प्रवक्ते आगरी कोळी कराडी महाराष्ट्र राज्य,रायगड भूषण प्रा.एल बी पाटील शेतकरी कामगार पक्ष जेष्ठ नेते,अनंत घरत डोंगरी शेतकरी कामगार पक्ष नेते,सीमाताईं घरत शेकाप उरण तालुका महिला अध्यक्ष,भालचंद्र पाटील जेष्ठ समाजसेवक व उपोषण कर्ता,शेखर तांडेल
BJP युवा मोर्चा उरण तालुका अध्यक्ष,जयप्रकाश पाटील नवघर ग्राम सुधारणा मंडळ अध्यक्ष,समाधान तांडेल
पंच नवघर ग्राम सुधारणा मंडळ,रमाकांत पाटील सदस्य ग्राम पंचायत सदस्य रांजणपाडा,संतोष भगत आम आदमी पार्टी तालुकाध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते मनोहर भोईर, अनघा प्रदीप कडू टीव्ही कलाकार,पपन पाटील रायगड भूषण पुरस्कार प्राप्त- टीव्ही कलाकार,हितेश कडू आगरी कोळी फेम गायक – गीतकार तसेच रामशेठ ठाकूर माजी खासदार, मनोहर भोईर माजी आमदार व जिल्हा अध्यक्ष शिवसेना, रवीशेठ पाटील अध्यक्ष संस्थापक श्री साई मंदिर देवस्थान वहाळ हे काही अपरिहार्य कारणास्तव हजर राहू शकले नाहीत परंतू त्यांनी फोन द्वारे शुभेच्छा तसेच पाठिंबा जाहीर केला आहे.
महत्वाचे म्हणजे ऑस्ट्रेलिया हून आलेले पौल मक्लिअर हे
आंतराष्ट्रीय वाहतूक (ITF) ज्यांचे जगभरात 150 देशात ब्रॅंचेस तसेच 5 कोटीच्या वर सदस्य आहेत़ जे पोर्ट मधील कामगार तसेच स्थानिकांच्या ज्या समस्या आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी ते भारताच्या दौऱ्यावर होते ते जेएनपीटी पोर्टच्या भेटीसाठी असताना त्यांनी अचानक उपोषणास्थळी येऊन त्यांनी समस्या जाणून घेत उपस्थितांना मार्गदर्शन केले व उपोषण कर्त्यांचा आवाज जगभर पोचवणार असल्याचे वचन दिले.
विविध मागण्या खालीलप्रमाणे
1)रत्नेश्वरी आईची मंदिराची जेएनपीटीने नव्याने बांधलेल्या उड्डाणपूलमुळे दुरावस्था झालेली आहे. तरी त्याची संपूर्ण जबाबदारी जे. एन. पी. टी. ने ध्यावी, तसे लेखी स्वरूपात पत्र ग्रामपंचायतीकडे द्यावे.
2) यश बाबू शेळके या मुलाला जो अपघात झाला आहे. त्याला जे. एन. पी. टी. मध्ये नोकरी द्यावी अन्यथा पेन्शन चालू करून आयुष्यभर जिम्मेदारी जे. एन. पी. टी. ने घ्यावी.
3)सेझमधील येणारे प्रकल्पात जसखार गावाला प्राचान्य देण्यात यावे.
4) मागील 4 वर्षे पाणी जसखार गावामध्ये आपल्या चुकीच्या नियोजनामुळे भरले आहे त्याची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी.
5)रत्नेश्वरी आई मंदिरा लगतची जी घरे आहेत ती जे. एन. पी. टी. च्या उड्डाणपूलाच्या कामांमुळे बिकट अवस्थेमध्ये झालेली आहेत त्याची नुकसान भरपाई त्वरीत द्यावी.
6) जसखार गावाच्या रेल्वे साईडची जी घरे आहेत त्यांना सुद्धा रेल्वेमुळे व अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे हादरे बसत असल्याने त्या घरांचे नुकसान होत आहे तरी त्यांची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी.
7)जसखार, सोनारी- सावरखार करळ हा रेल्वे साईटचा पारंपारिक रस्ता त्वरीत करून द्यावा.
8)पाण्याचे नियोजन जे. एन. पी. टी. इंजिनियर मार्फत करण्यात यावे व ते यावर्षी पाणी गावात शिरणार नाही असे लेखी पत्र ग्रामपंचायतीकडे द्यावे.
9)रेलवे साईडचा बी.एम.सी.टी.चा रस्ता त्वरीत बंद करावा.
10)जे. एन. पी. टी टाऊनशिपच्या सांडपाण्याची योग्य ती विल्हेवाट दूर अंतरावर लावावी.
11)पी.एस.ए.चा सर्वे नंबर जसखार गावाच्या हद्दीमध्ये नोंद करणे.
12) जसखार गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होण्यासाठी टाऊनशिप मधून पाईपलाईन टाकून पाण्याची व्यवस्था करावी.
13)जसखार गावातील नागरीकांना जे. एन. पी. टी. पोर्टमध्ये नोकरीकरीता प्राधान्य देण्यात यावे.
14) जसखार गावाला जे. एन. पी. टी. च्या सी. एस . आर. फंडामधून जास्तीत जास्त मदत करावी.
जसखार गावावर होणाऱ्या अन्याया संबंधी, समस्या संबंधी नौकानयन मंत्री भारत सरकार, मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,कोकण आयुक्त कोकण भवन सी.बी.डी. बेलापूर,पोलीस आयुक्त नवी मुंबई, जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग,तहसिलदार उरण,पोलीस आयुक्त बंदर विभाग, न्हावाशेवा, वरीष्ठ पोलीस निरीक्षक न्हावाशेवा पोलीस स्टेशन आदी ठिकाणी कायदेशीर पत्रव्यवहार देखील युवा सामाजिक संस्थेने केला. तरीही न्याय मिळत नसल्याने जसखार ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप पसरले आहे.