उरण चार फाटा येथे गतिरोधक बनविण्यासाठी आगरी कोळी कराडी सामाजिक संस्थेचे निवेदन उरण
नुकत्याच पूर्ण झालेल्या उरण चारफाटा येथील रस्त्याचे काम अतिशय उत्तम झालेले सर्वांनाच पाहायला मिळत आहे. पण, अति सुसज्य झालेल्या या रस्त्यामुळे अनेक वाहने अतिवेगाने रास्ता ओलांडत असतात तसेच रोजची रहदारी आणि वाहतूक लक्षात घेता दैनंदिन अपघातांचे प्रमाण देखील वाढेलेले पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आज आगरी, कोळी कराडी संघर्ष सामाजिक संस्था – उरण विभाग तर्फे. उरण तालुका अध्यक्ष सुमितजी थळे आणि उरण शहर अध्यक्ष श्री. रवींद्र भोईर यांच्या मार्फत सिडको उरण विभागाचे मुख्य अभियंता श्री. मुंडे साहेब यांना तातडीने गतिरोधक बनविण्याकरिता निवेदन दिले.
या वेळी मुंडे साहेबांनी काही दिवसातच काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन देखील दिले.
सदर .निवेदन देता ना आगरी कोळी.कराडी सामाजिक संस्थे चे उरण तालुका अध्यक्ष सुमित थळे. श्री. चंद्रशेखर भोमकर आणि उरण तालुका संघटक प्रांजल पाटील.आदी उपस्थित होते.