गवळी समाजाच्या मदतीला बबनदादा पाटील धावले; लवकरच प्रत्यक्षात नाल्याच्या कामाला होणार सुरुवात
पनवेल दि.१८ : करंजाडे वसाहतीतील गवळीवाडा वस्तीच्या बाजूलाच असलेल्या सांडपाणी वाहून जाणारा गटार नाला धोकादायक खोदून ठेवला असल्याने त्याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे. याकडे सिडकोचे दुर्लक्ष होत असल्याने येथील गवळी समाजाने प्रकल्पग्रस्तांचे कैवारी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांची भेट घेतली. यावेळी बबनदादा पाटील यांनी सिडकोच्या अधिकार्याना संपर्क साधून धारेवर धरत नाल्याचे काम लवकरात-लवकर सुरु करण्याचे सांगितले. यावेळी सिडको अधिकाऱयांनी नाल्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव दादा गायकवाड, साजन खाटा भरवाड, भोपा लाखा भरवाड, कान्हा खाटा भरवाड, राजू वासराम भरवाड, लाला खोडा भरवाड, वाघा खाटा भरवाड व गवळी समाज उपस्थित होते. नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर हे नोड सिडकोने एकविसाव्या शतकातील विकसीत शहर म्हणून विकसीत केले आहेत. त्याचबरोबर नव्याने करंजाडे वसाहतीची निर्मिती केली आहे. अत्याधुनिक शहर म्हणून सिडको प्राधिकरण या वसाहतींच ब्रँडिंगही करीत आहे. या सगळया गोष्टी कागदावर असल्या तरी या वसाहतींची स्थिती फारशी चांगली नाही. त्याचबरोबर करंजाडे वसाहतीकडे दुर्लक्ष करीत असताना याच ठिकाणी असलेली गवळी समाजाची वस्ती आहे. या वस्तीच्या बाजूलाच मोठा नाला आहे. या वस्तीच्या प्रवेशाजवळच मोठा नाला खोदून ठेवला आहे. या खोदून ठेवलेला खड्ड्यामध्ये पडून अपघात होण्याची शक्यता असल्याने सिडकोचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत यावेळी करंजाडे उपसरपंच योगेंद्र कैकाडी व शिवसेना करंजाडे शहर प्रमुख गौरव गायकवाड यांची गवळी समाजाने भेट घेत तक्रार केली, त्यानुसार गौरव गायकवाड यांनी या समाजातील कमिटीला शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांची भेट घेत खड्ड्याबाबत निवेदन दिले. यावेळी बबनदादा पाटील यांनी सिडकोच्या अधिकाऱयांना तात्काळ संपर्क साधून या खोदलेल्या खड्डयांबाबत माहिती देत तात्काळ हा धोकादायक खड्डाचे काम पूर्ण करण्याचे अधिकाऱयांना सांगतले. त्यानुसार सिडकोच्या अधिकाऱयांनी लवकरात-लवकर हे काम पूर्ण करू असे आश्वासन सिडको अधिकाऱयांनी दिले.
चौकट – गवळी समाजाने मानले आभार
करंजाडे येथील गवळी समाजाची समस्या भरपूर आहेत. मात्र येथीलच प्रवेशदवाराजवळ धोकादायक खोदलेला खड्ड्याची तक्रार करंजाडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच योगेंद्र कैकाडी, शिवसेना शहरप्रमुख गौरव गायकवाड यांनी प्रकल्पग्रस्तांचे कैवारी शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांच्या मार्फत अधिकाऱ्यापर्यंत हि समस्यां मांडल्याबद्दल यांचे गवळी समाजाने आभार मानले.
फोटो : शिवसेना संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांना निवेदन देताना गवळी समाज