पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांनी आपल्या उज्ज्वल निकालाची राखली परंपरा
पनवेल दि.१८ : विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून ज्या दहावीच्या निकालाची आतुरता लागली होती तो निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये पनवेल तालुक्यातील पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांनी आपला उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखला आहे. या सोसायटीच्या अंतर्गत असलेल्या शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे तसेच बारावीचा निकाल सुद्धा १०० टक्के लागला होता यामुळे पालक वर्गासह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबालभाई काझी यांनी बोलताना सांगितले कि, त्यांच्या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या तळोजा येथील राष्ट्रीय उर्दू हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. राष्ट्रीय उर्दू हायस्कूलमधून दहावी परीक्षेसाठी एकूण विद्यार्थी 137 बसले होते ते सर्व उत्तीर्ण होऊन शाळेचा निकाल 100% लागला आहे. यामध्ये मारिया खातून अताउल्ला 96.80 % हि शाळेत प्रथम आली आहे. तर पटेल ताहूरा अर्शद 95.66 % द्वितीय आणि काळोखे सादिया मुराद 94% हिने शाळेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच याकुब बेग हायस्कूल, पनवेलचा निकालसुद्धा 99.40 असा समाधानकारक लागला आहे. यापरीक्षेसाठी १८७ विद्यार्थी बसले होते यापैकी १८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून फक्त १ विद्र्यार्थीला एटीकेटी लागलेली आहे. तसेच शेख मारिया बी आसिफ 90.00% हिने शाळेतुन प्रथम, पटेल नबा मन्नान 89.20% दुसरा, पटेल खादिजा शमशुद्दुहा 89.00% तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचप्रमाणे अँग्लो उर्दू हायस्कुल बारापाडा याचा निकाल सुद्धा १०० टक्के लागला आहे. या परीक्षेत २० विद्यार्थी बसले होते त्यातील १२ जणांना डिस्टिंक्शन मिळाला असून ८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे पनवेल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इकबालभाई काझी यांनी अभिनंदन केले आहे. व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.