मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या नावाचा वापर करून केली दहा लाखांची फसवणूक कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल
पनवेल :– पुणे येथील विज्ञानविद्याप्रा कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी आर्थिक निधीची गरज असतानाच निवृत फॉरेस्ट अधिका-यांशी तक्रारदार यांची ओळख झाली. यावेळी दोन इन्व्हेस्टरानीं कोल्हापुरचे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासोबत जवळचे संबंध असल्याने लोन रकमेच्या अर्धा टक्का कमिशन अॅडव्हान्स त्यांचे स्विय सहाय्यकास द्यावे लागतील असे सांगून तक्रारदार महिला यांची सुमारे दहा लाख रुपये रकमेची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. याबाबत विनायक शंकरराव पाटील उर्फ विनायक शंकरराव रामुगडे राहणार कराड सातारा व एका अनोखी असे फसवणूक केलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार स्टारगेज पुणे येथे राहणारी 42 वर्षीय महिलेचा मे. विज्ञानविद्या प्रा.लि. नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या व्यवसायाची वाढ करण्यासाठी मोठ्या आर्थिक निधीची आवश्यकता असल्याने गेल्या एक वर्षांपासून या तक्रादार महिला बँक तसेच इन्व्हेस्टर यांच्याकडे पर्यटन करीत होते. यावेळी सोहम दिक्षीत यांच्यामार्फत कामोठे येथील अशोक जाधव या निवृत्त फॉरेस्ट अधिका-यांशी ओळख झाली. यावेळी त्यांना लोनबाबत माहिती दिली व मदत करण्यास सांगितले. यावेळी जाधव यांनी विनायक पाटील यांच्याविषयी माहिती दिली व संपर्क साधून दिला. यावेळी तक्रारदार महिला यांनी पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कि, कोल्हापुरचे महाराष्ट्र राज्याचे मा. मंत्री श्री. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासोबत माझे जवळचे संबंध असून तुमचे लोणचे काम करून देतो, मात्र त्याबदल्यात लोन रकमेच्या अर्धा टक्का कमिशन अॅडव्हान्स त्यांचे स्विय सहाय्यकास द्यावे लागतील असे सांगितले. यावेळी त्या महिलेने लोनची गरज असल्याने मदत करणारे अशोक जाधव यांना कळविले. यावेळी त्या महिला कामोठे येथे कागदपत्रे घेऊन पोहोचल्या यावेळी अशोक जाधव यांनी विनायक पाटील, अनिश काशिनाथ कांबळी त्यांची ओळख करून दिली. यावेळी विनायक पाटील यांनी मा. मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्याकडुन आमच्या कंपनीस रूपये 5 कोटींची गुंतवणुक करून देतील व याकरीता आम्हांला त्यांना 6 टक्के व्याज द्यावे लागेल याची माहिती त्या महिलेला दिली. याकरीता रोख रुपये अडीच लाख कमिशन अॅडव्हान्समध्ये बंटी पाटील यांच्या स्विय सहाय्यकाकरीता त्यांच्याकडे दयावे लागतील असे सांगितले. त्यावेळी विनायक पाटील यांनी श्री. बंटी पाटील यांचे स्वीय सहाय्यक भोसले यांच्याशी त्या महिलेचे संपर्क करून बोलणे करून दिले तेव्हा फोनवर समोरील व्यक्तीने आमचे काम होवून जाईल असे सांगितले. यावेळी त्या महिलेला विश्वास बसला. यावेळी अडीच लाख रुपये दिले. तसेच प्रपोजल फाईल व पैसे मंत्री बंटी पाटील यांच्या स्विय सहाय्यकाकडे अनिश कांबळी यांच्यामार्फत वाहनाने पाटविण्याकरिता वाहतुक खर्च म्हणून पाच हजार रुपये घेतले. तसेच तुळजापुर येथील 60 एकर जमीन जागा गिफ्ट डिड त्या महिलेचं नावावर करतो, व त्या जमिनीच्या बदल्यात लोन मिळेल असे सांगून 6 लाख रुपयांची मागणी केली. असे करून एकूण त्या तक्रादार महिलेची दहा लाख पाच हजार रुपये या भामट्यानी खोटे बोलून काढून घेतले. त्यानंतर काही दिवसांनी विनायक पाटील यांनी तक्रारदार महिला यांना फोन करून सांगतले कि कोल्हापूरची निवडणूक आहे, त्यामुळे काही काम होणार नाही, निवडणुकीनंतर बघू असे विविध कारणे देऊन लागल्याने तक्ररदार महिलांनी पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न केला असता पाटील यांचा फोन बंद लागला. याबाबत त्या महिलेने जाधव यांना संपर्क केला असता त्यांनी पाटील हा फसवणूक करणारा असल्याचा सांगितले. यावेळी त्या महिलेने तात्काळ कामोठे पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकारची माहिती दिली. व आरोपी विनायक शंकरराव पाटील उर्फ विनायक शंकरराव रामुगडे व एका अनोळखी व्यक्तीविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.