विवाहिता बेपत्ता
पनवेल दि.१८ : घरगुती वादाचा राग मनात धरून कोणास काही न सांगता एका विवाहिता महिला कुठेतरी निघून गेल्याने ती हरवल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
नईमा मोहम्मद शेलिया (वय २८), राहणार – भुसार मोहल्ला, पनवेल, रंग गोरा, उंची ५ फूट, डोक्याचे केस काळे, डोळे काळे, नाक सरळ, दोन्ही हाताच्या पंजावर व मनगटावर जखमा आहेत तसेच अंगाने मध्यम असून अंगात काळ्या रंगाचा पायजमा व तोंडावर बुरखा परिधान केला आहे. त्याचप्रमाणे पायात चॉकलेटी रंगाचा सॅंडल आहेत. तरी या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२-२७४५२३३३ किंवा पोहवा एच. जी. आहिरे यांच्याशी संपर्क साधावा.
फोटो : नईमा शेलिया